मुंबई : मुलगी TikTok वर Anna  नावाची युजर आहे. तिने टिकटॉकवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला. त्यात ती म्हटली की, तिचे आठ लोकांशी संबंध आहे. त्यात तिचा नवरा, मैत्रीण आणि जोडीदारासह Undetermined Gender व्यक्तीचाही समावेश आहे.  Annaच्या या व्हिडिओला 12 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओमध्ये,  Anna म्हणते की, एक सामान्य समज आहे की, Polyamorous Relationship मध्ये फक्त तीन लोकं नात्यात असतात.  परंतू Anna च्या म्हणण्यानुसार, आम्ही आठ जण एकमेकांशी जोडलेले आहोत आणि हे देखील एक Polyamorous नाते आहे. ती या नात्याला Poly-Cule किंवा Constellation असे नाव देते.


आठ लोकांशी संबंध?


Annaने सांगितले की आधी तिने जेकशी लग्न केले. जेक स्पेन्सरला डेट करत होता. स्पेन्सर एक Undetermined Gender व्यक्ती आहे. दरम्यान, Anna ची दुसरी मुलगी Ellieही पार्टनर बनली.



The Blazeच्या वृत्तानुसार, जेव्हा Ellieने तिचा पुरुष जोडीदार Izzyची  Annaशी ओळख करून दिली तेव्हा या नात्याला वेगळे वळण आले. त्यानंतर आणखी 3 लोक त्यांच्याशी जोडले गेले आणि नंतर ते सर्व एकमेकांशी जोडले गेले. सर्वजण एकत्र राहत नसले तरीही, एकूण आठ लोक एकत्र Polyamorous रिलेशनशीपमध्ये आहेत.


हजारो TikTok वापरकर्त्यांनी Annaच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर म्हणाले की अनेक सामाजिक नियम मोडले आहेत. तर कोणी विचारले की अशा प्रकारे समाज बिघडेल.
 त्याचबरोबर काही लोकांनी असेही सांगितले की, इतक्या लोकांसोबत राहिल्यामुळे मतभेद झाले असावेत.