viral video on social media : अनेक लोक डोळ्यांत कॉन्टॅक्ट लेन्स  (contact lenses) वापरतात. काही जण फॅशन (fashion) म्हणून वापरतात तर काही जण चष्म्याला पर्याय म्हणून वापरतात. कॉन्टॅक्ट लेन्स वेगवगळ्या रंगात उपलब्ध असतात . डोळ्यांच्या बुब्बुळांचा हवा तस रंग तुम्ही करून चारचौघात उठून दिसू शकता.  पण जसे तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरून छान दिसता पण जरासा निष्काळजी पण तुम्हाला तुमचे डोळे खराब करण्यास कारणीभूत ठरू शकतो  हे हि लक्षात ठेवलं पाहिजे.जर तुम्हाला लेन्स नीट कसे लावायचे किंवा काढायचे हे माहित नसेल तर त्यामुळे तुमच्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो.


आणखी वाचा: चक्क म्हशीने केला nora fatehiसारखा डान्स..व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका अमेरिकन महिलेसोबतही असेच घडले, तिला डॉक्टरांकडे गेल्यावर तिची गंभीर चूक लक्षात आली. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की डॉक्टरांनी महिलेच्या डोळ्यांतून एक, दोन नव्हे तर 23 कॉन्टॅक्ट लेन्स काढल्या. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


कैलिफोर्निया इथे राहणारी हि महिला दररोज कॉन्टॅक्ट लेन्स लावत असे  मात्र रोज रात्री झोपण्याआधी ते काढून ठेवायला ती विसरायची दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नवीन लेन्स ती लावायची. हा प्रकार जवळपास २३ दिवस चालू होता म्हणजे जवळपास 23 लेन्सेस तिच्या डोळ्यात


आणखी वाचा: साप चावल्यावर चुकूनही करू नका या गोष्टी..नाहीतर होईल मृत्यू


तशाच होत्या.  काही दिवसांनी तिच्या डोळ्यांना त्रास होऊ लागला तेव्हा ती डॉक्टरांकडे गेली आणि सर्व प्रकार पाहून स्वतः डॉक्टर हैराण झाले. आणि मग तिच्या डोळ्यातून त्या २३ लेन्सेस डॉक्टरांनी काढून टाकल्या.


 california_eye_associates नावाच्या इन्स्टा अकाऊंटवरून १३ सप्टेंबर रोजी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत ८१ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. व्हिडिओ शेअर करताना डॉक्टरांनी लिहिले की, "काल माझ्या क्लिनिकमध्ये एका महिलेच्या डोळ्यात


कॉन्टॅक्ट लेन्सचा गुच्छ बघायला मिळाला. डॉक्टर कॅटरिना कुर्तिएवा यांनी सांगितले की लेन्स काढण्यासाठी एक लहान शस्त्रक्रिया उपकरणाचा वापर करण्यात आला. सर्व लेन्स बाईंच्या डोळ्यात थरासारख्या चिकटल्या होत्या.