पायलटने त्याच्या पत्नीला परफेक्ट मर्डर प्लॅनकरुन संपवले, परंतु रोजच्या एका सवयीमुळे तो पकडला गेलाच
एका हॅलीकॉप्टर पायलटने आपल्या पत्नीला मारण्याचा असा प्लॅन रचला की, तो पोलिसांच्या तवडीत कधी ही अडकणार नाही.
ग्रीस (अॅथेन्स) : आरोपी कितीही हुशार असला तरी तो काही ना काही पुरावा नक्कीच मागे ठेवतो. फक्त तो पुरावा पोलिसांनी बरोबर ओळखायला हवा. ग्रीसमधील एका हॅलीकॉप्टर पायलटने आपल्या पत्नीला मारण्याचा असा प्लॅन रचला की, तो पोलिसांच्या तावडीत कधी ही अडकणार नाही. परंतु पोलिसांनी त्याला पुराव्यांसकट शोधून काढलेच. पोलिसांनी त्यांला कसे काय शोधून काढले याचा धक्का जेवढा या पायलटला बसला तेवढात तुम्हाला ही बसेल आणि तुम्ही देखील म्हणाल की, असा तर आम्ही कधी विचार देखील केला नसता.
हा हॅलिकॉप्टर पायलट 33 वर्षाचा आहे. त्याचे नाव बाबीस अनाग्मोस्टोपॉलोस आहे. त्याच्या 20 वर्षीय पत्नीचे नाव कॅरोलिन क्रॉउच आहे. हे दोघे पती पत्नी आणि त्यांचे लहान बाळ एका बेटावर फिरायला गेले होते. तेव्हा या पायलटने आपल्या पत्नीची हत्या केली.
या घटनेची माहिती पोलिसांना देताना पायलट बाबीस अनाग्मोस्टोपॉलोस म्हणाला की, या बेटावर काही चोरट्यांची टोळी आली, ज्यांनी त्याला एका खांब्याला बांधून ठेवले आणि त्याच्या पत्नीची हत्या केली. त्याने पोलिसांना हे देखील सांगितले की, त्यांच्या घरातील सीसीटीव्हीला ही या चोरट्यांनी 4-5 तासांपूर्वी बंद केले होते.
बाबीसने खरेतर हा एक परफेक्ट मर्डर प्लॅन केला होता. कारण बेटावर जास्त लोकसंख्या नसते, हे त्याला माहित होते. तसेच घराचा सीसीटीव्ही बंद असल्याचे सांगितल्यानंतर आजू बाजूला लोकवस्ती नसल्याने पोलिसांना कोणताही पुरावा मिळणार नाही हे त्याला माहित होते. तसेच जर पोलिसांना संशय आला, तरी पोलिसांकडे ठोस पुरावा नसल्याने त्यांना माझ्या कहाणीवर विश्वास ठेवण्याखेरीज दुसरा मार्ग उरणार नाही, हे बाबीसला माहित होते.
परंतु पोलिसांना नंतर बाबीसच्या स्टेप ट्रॅकर आणि पत्नीच्या हातील स्मार्ट घडाळ्यामुळे काही संशयात्मक पुरावे सापडले. ज्यामुळे पोलिसांनी बाबीसला अटक केलेच.
बाबीसने पोलिसांना त्याच्या पत्नीच्या मृत्यूची जी वेळ सांगितली होती. त्यावेळी त्याची पत्नी जिवंत होती आणि तिच्या हृदयाचे ठोके सुरू होते. हे पोलिसांना त्याच्या पत्नीच्या हातातून मिळालेल्या घड्याळावरुन समजले. त्यानंतर पोलिसांना बाबीसवर संशय आला आणि त्यांनी आणखी पुरावे जमवायला सुरवात केली.
पोलिसांच्या असे लक्षात आले की, ज्या वेळत बाबीस त्याला खांब्याला चोरट्यांनी बाधून ठेवले आहे असे सांगित आहे. त्यावळेत त्याला खांब्याला बांधलेले नव्हते किंवा तो एका जागेवर थांबला देखील नव्हता.
बाबीसच्या स्टेप ट्रॅकरच्या माध्यमातून पोलिसांच्या हे समोर आले. एवढेच काय तर बाबीसने सांगितलेल्या वेळे आधी किंवा त्या वेळेनंतर त्याचे स्टेप ट्रॅकिंग तो चालत असल्याचे दाखवत आहे. बाबीस एका जागेवरती थांबलाच नव्हता किंवा त्याला बांधले गेले नव्हते असे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी या सगळ्याचा पुरावा देत. बाबीसला बोलतं केलं आणि बाबीसने ही आपला गुन्हा मान्य केला.
बाबीसने सांगितले की, त्या दोघात हॉटेल बदण्यावरुन भांडण झाले होते. तेव्हा त्या दोघांमध्ये झटापट झाली आणि रागाच्या भरात त्याने नकळत त्याच्या पत्नीचा गळा दाबला. परंतु असे असले तरी यामगचे कारण काही वेगळे आहे. जे अद्याप बाबीसने मान्य केले नाही. कराण त्याने त्याचा रुमचा सीसीटीव्ही ठरवून बंद केला होता.