परीक्षेत मुलांना प्रोत्साहन मिळावं म्हणून शिक्षकानं केला भन्नाट जुगाड; होतंय कौतुक, उत्तरपत्रिकेवर चक्क...
Viral Teacher Meme Sticker Video: आपल्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन मिळावे म्हणून सध्या एका शिक्षकानं चांगलीच शक्कल चढवली आहे. यावेळी या जुगाडाचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर जोरात व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी या व्हिडीओला प्रचंड लाईक्स आणि कमेंट्सही मिळाले आहेत.
Viral Teacher Meme Sticker Video: परीक्षेत आपल्या चांगले गुण मिळावेत म्हणून विद्यार्थ्यांसह पालकही तितक्यात हिरहिरीनं प्रयत्न करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी म्हणून भन्नाट जुगाड केला आहे. सध्या शिक्षकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनीही भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. आपल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षकानं वापरलेल्या या युक्तीचे सर्वजण कौतुकही करताना दिसत आहेत. यावेळी हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होताना दिसतो आहे. सध्याचे जग हे मीम्स आहे. आजकाल मीम्स हे सोशल मीडियावर जोरात व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे अशा मीम्सचे लहान मुलांनाही आकर्षण असते.
आजकाल मीम्समध्ये चमकणारेही लहान मुलांसाठी हिरो असतात. मग तो कोणी सामान्य माणूस असो, अभिनेता, गायक, प्राणी किंवा कार्टून. परंतु याचे तरूणांनाच नाही तर लहान मुलांनाही प्रचंड आकर्षण वाटते. सध्या याचाच वापर करून शिक्षकानं ज्यांना परीक्षेत चांगले गुण मिळाले आहेत. त्यांच्या गुणपत्रिकांवर त्यांनी अशाच काही लोकप्रिय मीन्सचे स्टीकर्स लावले आहेत. जेणेकरून विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल. त्यांचाही उत्साह वाढेल. विद्यार्थ्यांना पुढचा अभ्यास करण्यासाठीही इच्छा आणि उत्सुकता निर्माण होईल या अर्थानं या शिक्षकानं ही भन्नाट आयडिया वापरली आहे. त्याच्या या कल्पनेचे तुम्हीही कौतुक कराल.
हेही वाचा : रोमॅण्टिक, अॅक्शन नाही तर अक्षय कुमारचा 'मिशन रानीगंज' नेटफ्लिक्सवर नंबर 1 क्रमांकावर
अनेकदा असं होतं की जेव्हा आपल्या मुलांना परीक्षेत कमी मार्क्स मिळतात तेव्हा पालक किंवा शिक्षक त्यांना प्रचंड ओरडतात. त्याचसोबत त्यांचे मानसिक खच्चीकरणही केले जाते, असंही काहीवेळा पाहण्यात येते परंतु त्यांना योग्य मार्गदर्शक आणि कमी मार्क्स मिळाले तरी त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तेव्हा अशावेळी काहीतरी क्लृप्त्याही मोठ्यांनी लढवणं हे गरजेचे असते. अशातच हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.
@TheFigen_ नावाच्या X युझरनं हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यावेळी 45 सेकंदाचा हा व्हिडीओ 14 मिलियन लोकांनी पाहिला आहे. यावेळी या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनीही भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.