Viral News : ती 2nd हँड अंतर्वस्त्र घालते, 20 वर्षांपासून नवीन कपडेही घेतले नाही; कारण जाणून बसेल धक्का
Viral News : ऐकावं ते नवलं! या जगात विचित्र माणसांची कमी नाही. त्यांचा विचित्र कृतीमुळे ते जगभरात प्रसिद्ध आहेत. अशी एक महिला जी 2nd हँड अंतर्वस्त्र घालते, 20 वर्षांपासून नवीन कपडेही तिने घेतले नाही...
Trending News : या जगात किती विचित्र लोक असतात त्याची कृती ऐकून आपल्याला धक्का बसतो. इथे प्रत्येक व्यक्ती आपल्या आणि आपल्या घरच्यांचा गरजा पूर्ण करण्यासाठी जगतो. श्रीमंत लोकांचे तर थाटच काही और असतात. त्यांचा प्रत्येक गोष्टींची किंमत ऐकली तरी आपल्याला घाम फुटतो. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मुलगा आकाश आणि राधिकाचा साखरपुडा (Akash and Radhika) असो, किंवा कियारा आणि सिद्धार्थचं लग्न (Kiara and Siddharth's wedding) असतो. कोट्यावधीच्या घरात यांनी खर्च केला. या जगात अनेक जणांना सवय असते पैसे खर्च करताना ते मागेपुढे पाहत नाही. अगदी कर्ज काढून खर्च करतात. पण या जगात एक अशी पण महिला आहे जिचं कृत्य ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
आता हद्दच झाली!
ज्या महिलेची सर्वत्र चर्चा होते तिच्या कंजूषपणाची ऐकून तुम्ही पण म्हणाल आता तर हद्दच झाली. साउथ वेल्सची रहिवासी अँजेला मॉर्टन ही दोन मुलांची आई आहे. गेल्या 20 वर्षांपासून, ती सेकंड हँड कपडे किंवा फक्त स्वस्त कपडे खरेदी करत. तुम्हाला प्रश्न पडला असेल, की ती असं काय करते. ते फक्त पैशांची बचत करण्यासाठी हे सगळं करते. एवढंच नाही तर ती अंतर्वस्त्रदेखील सेकंड हँड (woman wear second hand underwear)) खरेदी करायची. अगदी ते पूर्णपणे फाटेपर्यंत ती ते वापरते. (Viral Trending news ajab gajab woman wear second hand underwear and bought new clothes for 20 years)
तिचे कपडे किंवा इतर सामान खरेदी करण्यासाठी ती eBay आणि Vinted चा वापर करायची. सेकंड हँड शॉपिंगमधून तिने हजारो रुपयांची बचत केल्याचे तिने सांगितले. अलीकडेच तिने 3 सेकंड हँड वस्तू विकत घेतल्या आणि त्यातून तिने सुमारे 1.4 लाख रुपये वाचवले.
मुलांनाही लावली सेकंड हँड कपड्याची सवय
तिने तिच्या मुलांनाही सेकंड हँड कपडे वापरण्याची सवय लावली आहे. गेल्या 10 वर्षांपासून तेदेखील सेकंड हँड कपडे वापरतात. हळूहळू त्यांनी हा फॅशन ट्रेंड बनवला.