Viral Video of 12 Year Old Boy While WeightLifting: अनेक मुलांना बॉडी बनवायची (Body Building Craze) खूप क्रेझ असते. त्यातून लहान मुलांमध्येही हल्ली बॉडी बनवण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. त्यामुळे आजकाल लहान लहान मुलंही बॉडी बिल्डिंगचे प्रशिक्षणही (Body Building in Little Boys) घेताना दिसत आहेत. ही लहान मुलंही बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धेमध्ये उतरले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये. त्यामुळे त्याचा परिणाम काहीप्रमाणात पालकांनाही भोगावा लागतो आहे. परंतु ब्राझीलमधल्या (Brazil News) एका मुलानं एक वेगळाच चमत्कार केला आहे. त्यानं वयाच्या 12 व्या वर्षीच बॉडी बनवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या त्याचे हे व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे हे व्हिडीओज पाहून नेटकरी नाना तऱ्हेच्या कमेंट्स करतानाही दिसत आहेत. यावेळी या मुलांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात हा मुलगा जीममध्ये बॉडी बिल्डिंग (Body Building Video) करताना दिसतो आहे. 


सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल 


लहान मुलांमध्ये एकीकडे आपण कुपोषणाची समस्या पाहिली आहे जी आजही फार गंभीर आहे परंतु कधी बॉडी बनवून सोशल मीडियावर झळकणाऱ्या बारा वर्षाच्या लहान मुलाला तुम्ही कधी पाहिले आहे का? सध्या अशाच एका लहान मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे एवढ्या कमी वयात (Weightlifting Video) चांगलीच बॉडी तयार केल्यानं सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पाहून सगळेच अवाक झाले आहे. तर अनेकांकडून त्याचे कौतुकही होताना दिसत आहे. 


वेटलिफ्टिंग आणि लोकांचे कौतुक 


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा मुलगा लिफ्टींग करतो आहे आणि वजन उचलताना दिसतो आहे. त्याच्या आजूबाजूला एव्हाना जिममध्ये लोक आहेत जी त्याला चिअर अप करताना दिसत आहेत. तेव्हा वेटलिफ्टिंग करताना तो हे वजन अगदी मेहनतीनं उचलताना दिसतो आहे व त्याचबरोबर त्याच्या या मेहनतीचे सगळेजण कौतुक करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ @cacauzinho_neto नं इन्टाग्रामवर पोस्ट केला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


त्याचे इन्टाग्रामवर पेज आहे. जिथे तो आपल्या डाएट आणि फिटनेसबद्दल (Fitness) त्याच्या चाहत्यांना सांगत असतो. रोज पाच किलोमीटर तो धावतो असं त्यानं सांगितले. तो 91 किलोचे डेडिलिफ्ट उचलतो आणि त्याचे स्वत:चे वजन हे 37 किलो आहे. वीक डेला तो पहाटे 5.30 वाजता उठतो आणि सिट अप्स करतो व त्यानंतर तो 5 किलोमीटर धावायला जातो. संध्याकाळी आणि रात्री तो वेळेनुसार वर्कआऊट करतो. त्यामुळे त्याच्या या फीट लाईफचे सगळीकडेच कौतुक होते आहे.