पॅरिस : आजपर्यंत तुम्ही सिनेमांमध्ये स्पायडर मॅन पाहिला असेल किंवा त्याच्या रोमांचक स्टोरीज ऐकल्या असतील. मात्र, पॅरिसमधील नागरिकांनी खरोखर स्पायडर मॅन पाहिला्. या 'स्पायडर मॅन'ने ही स्वत:चा जीव धोक्यात घालून एका चार वर्षीय चिमुकल्याचे प्राण वाचवले.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण पॅरिसमध्ये एका सहा मजल्याच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या बालकनीत चार वर्षीय चिमुकला खेळत होता. मात्र, त्याच दरम्यान तो खेळता-खेळता अचानक बालकनी बाहेर लटकतो. एका हाताच्या सहाय्याने तो बालकनीत लटकला होता.


चिमुकल्याला पाहून आपल्या प्राणाची पर्वा न करता मामोउदोउ गसामा नावाचा एक तरुण स्पायडर मॅन प्रमाणे इमारतीवर चढला आणि त्याने चिमुकल्याचे प्राण वाचवले.



शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पॅरिसमधील या 'स्पायडर मॅन'ने चिमुकल्याचे प्राण वाचवले आणि त्या दरम्यान तेथे उपस्थित नागरिकांनी संपूर्ण दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तसेच या तरुणाचं तोंडभरुन कौतुकही करत आहेत.