नवी दिल्ली : वाढतं वय ही संकल्पना अनेकांना ठाऊक नसते. अशा व्यक्ती कायमच इतरांना जगण्याचा अनोखा दृष्टीकोन देत असतात. याचंच उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये एक वयोवृद्ध महिला अतिशय सुरेखपणे नृत्य करताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजीबाईंचं नृत्य पाहताना त्यांच्या वयाचा विसर पाहणाऱ्यांनाही पडत आहे. आणखी एक बाब म्हणजे आजीबाईंचा फिटनेस. सहसा वय वाढत गेलं की आजारपण आणि दुखणीही वाढतात. पण, या आजी मात्र त्याला अपवाद ठरत आहेत असं म्हणायला हरकत नाही. 


टिकटॉकनं दिली नवी ओळख 
टिकटॉकनं आजवर अनेकांना प्रसिद्धी दिली आहे. भारतात या अॅपच्या वापरावर बंदी घालण्यात आलेली असली तरीही युट्यूबवर येणारे टिकटॉकचे व्हिडीओ अनेकांनाच प्रसिद्धीझोतात आणतात. याचंच उदाहरण म्हणजे 78 वर्षीय आजीबाईंचा व्हायरल होणारा एक व्हिडीओ. 



आजीबाईंचे ठुमके पाहता, त्यांची अनोखी अदाकारी नेटकऱ्यांच्या मनाचा ठाव घेत आहे. अनेकांनी तो व्हिडीओ शेअर केला आहे, तर काहींनी त्यावर कमेंटही केली आहे. सोशल मीडियावर उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार या आजीबाई मुळच्या नेपाळ (Nepal) येथील असून, त्यांचं नाव कृष्णकुमारी तिवारी (Krisha Kumari Tiwari) असं आहे.