Viral video : माशाच्या पोटात, या माणसाला असा जॅकपॉट लागला, तो लखपती तर नाही झाला पण........
असे म्हटले जाते की, समुद्रात खूप काही लपलेले असते. फक्त त्याची माहिती आपल्याला नसते.
मुंबई : असे म्हटले जाते की, समुद्रात खूप काही लपलेले असते. फक्त त्याची माहिती आपल्याला नसते. पुरातन काळात देवांनी आणि दैत्यांना देखील समुद्र मंथन करुन समुद्राच्या पोटात लपलेल्या गोष्टींना बाहेर काढले होते. एवढंच काय तर, समुद्राने अनेक लोकांना बऱ्याचदा अशी काही भेट दिली आहे की, लोकं लखपती झाली आहेत. अशीच एक घटना एका मासे पकडणाऱ्या माणसासोबत घडली आहे.
या मासे पकडणाऱ्या व्यक्तीच्या हातात असा काही जॅकपॉट लागला आहे, ज्यामुळे तो लखपती तर नाही झाला. परंतु त्याच्या हाती जे लागले त्या गोष्टीने ते आनंद मात्र नक्की दिला.
खरेतर समुद्रात खोल मासेमारी करायला गेलेल्या एका व्यक्तीच्या जाळ्यात असा मासा अडकला ज्याने या माणसाला खुश केले. जाळ्यात अडकलेला मासा या व्यक्तीला जड लागला आणि त्याच्या पोटात काय आहे हे पाहाण्यासाठी त्याने मास्याचे पोट कापले आणि पाहातो तर काय त्याला माशाच्य़ा पोटात सिल पॅक विस्कीची बाटली मिळाली. ही whisky, Fireball Cinnamon ची आहे.
टिकटॉकवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एक माणूस आपल्या जोडीदारासह जहाजातून मासेमारी करताना दिसत आहे. मोसेमारी करत असताना त्यांच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या माशाच्या पोटात या माणसाला एक सिल पॅक विस्कीची बाटली मिळाली. ज्यानंतर तो व्यक्ती इतका खूश झाला की, तो 'जॅकपॉट', 'जॅकपॉट' म्हणून ओरडू लागला.
या माणसाचं नशीब आणि त्याची प्रतिक्रिया या दोन्हीमुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावरती इतका व्हायरल झाला आहे की, त्याला 5.8 मिलीयन्स हून अधीक वेळा पाहिले गेले आहे.