Viral Video Company 70 Crore Rs: कॉर्परेटमधील काही कंपन्या फारच कंजूस असतात तर काही अगदीच दिलदार. अगदी मोजक्या कर्मचारीधार्जिण कंपन्या आपल्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी आणि बक्षिस देण्याच्या उद्देशाने काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करतात. अशाच एका कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या पार्टमध्ये कर्मचाऱ्यांना मालामाल करणारा एक विचित्र गेम आयोजित केला होता. कंपनीच्या मालकांनी पार्टीमध्ये एका लांबलचक टेबलवर तब्बल 70 कोटी रुपयांची कॅश ठेवली कर्मचाऱ्यांना या टेबलच्या दोन्ही बाजूंना रांगेत उभं केलं आणि 'तुम्हाला 15 मिनिटांमध्ये यापैकी जेवढे पैसे मोजता येतील तेवढे मोजून घेऊन जा,' असं सांगितलं. यानंतर कर्मचाऱ्यांचा एकच गोंधळ उडाला.


कोणती आहे ही कंपनी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिनान मायनिंग क्रेन कंपनी लिमिटेड असं हा अनोखा बोनस देणाऱ्या कंपनीचं नाव असून त्यांनी शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल होतोय. ही चिनी कंपनी असून त्यांनी चीनमधील सोशल मिडिया प्लॅटफॉर्म डुईन आणि विबोवर व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसेच हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरही पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एका मोठ्या टेबलवर नोटा पसरवून ठेवल्याचं दिसत आहे. तर या नोटांपैकी जास्तीत जास्त नोटा मोजून आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी धडपडत असताना दिसत आहेत.


एकाने गोळा केले 12 लाख रुपये


समोर आलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने 15 मिनिटांमध्ये 100 हजार युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार 12 लाखांहून अधिक मूल्य असलेल्या नोटा मोजल्या. इतरांनीही जास्तीत जास्त पैसे मोजण्याचा प्रयत्न केला. या पार्टीमधील व्हिडीओ वेगवेगळ्या कॅप्शनने शेअर करण्यात आलेत. "हिनान कंपनीने वर्षाच्या शेवटी कोट्यवधी रुपये बोनस म्हणून दिले आहेत. जेवढ्या नोटा मोजता येतील तेवढ्या मोजून घरी न्या, असं कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं आहे," असं एका कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Mothership (@mothershipsg)


अनेकांच्या मजेदार प्रतिक्रिया


या व्हिडीओवर अनेकांनी मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्यात. एकाने, "मी काम करतो ती कंपनीही असं करते. फक्त नोटांऐवजी ते काम देतात आणि जेवढं घरी नेता येईल तेवढं न्या असं सांगतात," असं म्हटलं आहे. "हे असलं पेपरवर्क मलाही चालेल. पण माझ्या कंपनीच्या मनात वेगळं काहीतरी आहे," असं अन्य एकाने म्हटलं आहे. "कंपनीने थेट खात्यावर पैसे जमा करायला हवे होते. मात्र त्यांनी ही अशी सर्कस मांडली. हा एक प्रकारे कर्मचाऱ्यांचा अपमानच आहे," असं म्हणत एकाने नाराजी व्यक्त केली आहे. याचं कंपनीने 2023 मध्ये कर्मचाऱ्यांना वार्षिक पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम बोनस म्हणून वाटली होती.