Comet over Spain and Portugal: विश्वाच्या उत्पत्तीपासून ऱ्हासापर्यंत आजवर अनेक सिद्धांत मांडण्यात आले आहेत. या विश्वाचा पसारा नेमका किती मोठा आहे याची प्रचिती या सिद्धांतांमुळं आणि नासा, इस्रो आणि इतरही देशांच्या अंतराळ संशोधन संस्थांमुळे मिळाली आहे. पृथ्वीच्या कक्षेपलिकडेही एक विश्व असून, त्या विश्वातही असंख्य हालचाली सुरु आहेत, पण त्या हालचाली सर्वसामान्यपणे पाहणं जवळपास अशक्यच. इथं मात्र नुकतीच घडलेली एक घटना काही अंशी अपवाद ठरत आहे. 


...आणि आकाश प्रकाशमान झालं 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर स्पेन, पोर्तुगालमधून काही व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यामध्ये एका इनफ्लुएन्सरच्या व्हिडीओनं सर्वांच्याच नजरा वळवल्या आहेत. milarefacho नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या युजरनं ज्यावेळी तिच्या मोबाईलचा सेल्फी कॅमेरा सुरू केला त्यावेळी अनपेक्षितपणे आकाश प्रकाशमान झालं. 


हिरवा आणि निळसर प्रकाश सर्वत्र पसरला आणि पाहता पाहता वायूवेगानं एक प्रकाशमान रेष आकाशातून अतिप्रचंड वेगानं पुढे गेली. त्या रेषेच्या प्रारंभी टोकाशी एक प्रकाशाचा गोळा दिसून आला. स्पेन आणि पोर्तुगाल या देशांवरून आभाळातून जाणारी ती वेगवान वस्तू होती तरी काय? माहितीये? 


ही वस्तू होती एक धूमकेतू. काळ्याकुट्ट नभालाही प्रकाशमान करत पुढे गेलेल्या या धूमकेतूनं संपूर्ण जगाला थक्क केलं. स्पेन आणि पोर्तुगालमध्ये काहींनी ही दृश्य कॅमेरामध्ये टीपण्याचा प्रयत्न केला आणि निसर्गाचं हे अद्भूत रुप सर्वांसमोर आणलं. युरोपीय अंतराळ संशोधन संस्थांच्या माहितीनुसार हा धूमकेतू साधारण ताशी 1.62 लाख किलोमीटर इतक्या प्रचंड वेगानं पुढे गेला. वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार पृथ्वीपासून साधारण 60 किमी अंतरावरून अटलांटिक महासागरावर हा धूमकेतू नाश पावला. 



हेसुद्धा वाचा : Pillars Of Light: रात्रीस खेळ चाले...! आभाळात अचानक दिसले रहस्यमयी प्रकाशमान थांब; पाहून उडाला थरकाप...


 


सोशल मीडियावर या क्षणाचे व्हिडीओ शॉर्ट्स आणि रील्स स्वरुपात उपलब्ध असून, ही दशकातील पहिलीच घटना असल्याचा दावा काहींनी केला. तर, ही दृश्य पाहून अनेकांनाच हॉलिवूडच्या ख्रिस्तोफल नोलानचा 'इंटरस्टेलर' हा चित्रपट आठवला. समांतर विश्वातील गोष्टींची उकल करत एका अद्वितीय जगताची सफर घडवणाऱ्या या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनात कमालीचं स्थान निर्माण केलं होतं. तुम्ही हा धूमकेतू पाहून काय म्हणाल?