Kili Paul : टांझानियाचा प्रसिद्ध सोशल मीडिया सेन्सेशन किली पॉल (Kili Paul) त्याच्या व्हिडिओसाठी खुप प्रसिद्ध आहे. त्याचे व्हिडिओ भारतात जास्त पाहिले जातात, यामागचे कारण म्हणजे, तो बॉलिवूड गाण्यावर सर्वांधिक व्हिडिओ बनवत असतो. त्यात आता तो भोजपूरी गाण्याच्याही प्रेमात पडल्याचे दिसत आहे. या संबंधित त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या त्याच्या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किली पॉल (Kili Paul) बॉलिवूडच्या हिंदी गाण्यावर जास्त व्हिडिओ बनवतो, जे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.पण यावेळी किली पॉल (Kili Paul) त्याच्या भोजपूरी व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. भोजपूरी गाण्यावरचा त्याचा एक अप्रतिम डान्स व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओची चर्चा रंगली आहे.   


व्हिडिओत काय?


आजकाल इन्टाग्राम ओपन केल्या केल्या 'पतली कमर' (patli kamariya) हेच गाण वाजतय. कारण याच गाण्यावर सध्या भारतात जास्त रिल्स बनतायत. जो तो इन्टाग्राम ओपन करतोय, त्याच्या फोनवर हेच गाण वाजतंय. याच गाण्यावर आता किली पॉलने डान्स केला आहे.'पतली कमरीया मोरे हाय हाय' (patli kamariya) गाण्यावर किली पॉलने भन्नाट डान्स केला आहे. या व्हिडिओमध्ये डान्ससोबत तो लिपसिंग देखील करत आहे. या व्हिडिओमध्ये शानदार डान्स करताना दिसत आहे. 


किली पॉलने (Kili Paul) त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. किली पॉलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक सोशल मीडिया यूजर्स या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Kili Paul (@kili_paul)


>


किली पॉल (Kili Paul Instagram) हा इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवुन प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. त्याचे इंस्टाग्रामवर 2.4 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. आपल्या बहिणीसोबत त्याने शेरशाह चित्रपट, राता लांबिया, श्रीवल्ली, सामी आणि इतर अनेक गाण्यांवर रील बनवली आहेत.