Flood Viral Video : पूर आणि मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी विध्वंस रुप अंगावर काटा आणणारे क्षण व्हिडीओ पाहून जीव नकोसा होतो. उत्तराखंडमध्ये गौरीकुंडमध्य भूस्खलन अनेक जण बेपत्ता झाले आहे. पुराच्या वेगवान पाण्यात अनेक जीव वाहून गेल्याचा घटनेचे थरारक व्हिडीओ समोर आले आहेत. एवढंच नाही तर पुरात अनेक वाहनं तसंच अनेक घरं वाहून गेल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर सध्या पुराच्या पाण्यात श्वान वाहून गेल्याचा एक व्हिडीओ मन अस्वस्थ करतोय. (Viral Video Man Savd Dog Life Flood Trending Video On Instagram)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून भारतात असो किंवा जगात पावसाने आपले रौद्ररुप दाखवल्यामुळे पुराने अनेक संसार उद्धवस्त झाले आहेत. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक श्वान पुराच्या पाण्यात बुडताना दिसून आहे. पाण्याचा वेग अतिशय वेगवान असल्याने त्या श्वानाला जीव वाचविण्यासाठी धडपड करताना तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता. 


पाण्याचा जोर अतिशय भयानक असल्याने त्या श्वानाला काही केल्या त्यातून बाहेर पडता येतं नव्हते. जीवाचा औकांताने तो कसा बसा नदीच्या कडेला जाऊन आसरा शोधतो. पण त्या आडोसाला उंच भिंतीवरुन त्याला चढणं शक्य होतं नव्हतं. पाण्याचा जोर वाढत होता, तो श्वास जास्त वेळ तिथे थांबू शकत नव्हता. 


तो देवदूत ठरला!


काही क्षणाने तिथे एक व्यक्ती येतो आणि तो त्याला श्वानाला वाचवतो. त्या देवदूतामुळे पुराच्या पाण्यातून त्या श्वानाची सुटका झाली. त्याने व्यक्तीने दोरीच्या सहाय्याने कुत्र्याला पाण्यातून बाहेर काढलं. 



हा व्हिडीओ ट्वीटरवर म्हणजे X वर @DaleRTyMG या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.