Trending Video : हृदयविकाराचा झटका आल्यावर रुग्णांना CPR देण्यात येतं. आपण सोशल मीडियावर अशा घटनांचे अनेक व्हिडीओ पाहिले आहे. त्या व्यक्तींसाठी तो माणूस देवदूत ठरतो. जेव्हा अचानक कुठे उद्यानात, कधी ऑफिसमध्ये तर बागेत फिरताना चकर येऊन एखादा व्यक्ती पडतो आणि त्याचा श्वास थांबतो. अशावेळी त्या व्यक्तीला वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते. जर ती मिळाली नाही तर त्याचा जीव जाण्याची भीती असते. ज्या लोकांना CPR देण्याची वेळ येते आणि एखादा व्यक्ती देवदूत म्हणून त्याचा मदतीला येतो तो रुग्ण खरंच नशिबवान असतो. (emotional video)


हा खरा देवदूत! 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही झाली माणसाची गोष्ट पण जर कुठल्या प्राण्याला वैद्यकीय मदत हवी असेल तर. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एका श्वानाला ताबडतोब वैद्यकीय मदतीची गरज होती. तो डॉग आपल्या मालकीणसोबत बागेत फिरायला आला होता. पण अचानक त्या कुत्र्याची तब्येत खराब होते आणि तो बेशुद्ध पडतो. त्याला या अवस्थेत पाहून एक व्यक्ती त्याचा मदतीला धावत येतो. (viral video man saves doggy life with cpr kiss Trending Video on Social media emotional watch)


अन् त्याने CPR देऊन...


तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता तो व्यक्ती श्वानाला CPR देताना दिसत आहे. तरीही श्वान हालचाल करत नव्हता. शेवटी त्या व्यक्तीने श्वानाला किस करुन CPR दिला. असं त्याने दोन तीन वेळा केलं अन् हे काय त्या श्वानाने श्वास घेतला आणि तो शुद्धीवर आला. 


तो डॉगी आपली शेपटी हलवायला लागतो. हे पाहून सगळे जण भावूक होतात. नेटकरीही हा व्हिडीओपाहून भावूक झाले आहेत. नंतर हा डॉगी उठून बसतो आणि त्या व्यक्तीच्या अवतीभोवती उड्या मारायला लागतो. जणू काही तो त्या व्यक्तीचे आभार मानतोय. त्या व्यक्तीने आपला जीव वाचविला ही जाण त्या श्वानाला झाली हेच त्याचा या उड्यांमधून दिसून येतं आहे. 


या पाळीव श्वानाची मालकीन यांनीदेखील त्या व्यक्तीचे आभार मानले. या जगात जिथे रक्ताची नाते एकमेकांना दगा देतात. माणसू माणसाचा वैरी आहे, अशा या दुनियेत जेव्हा असा व्हिडीओ समोर येतो तेव्हा आयुष्यात असेही देवदूत आहेत यावर विश्वास बसतो आणि मन सकारात्मक होतं. 



हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील.