ट्रेन चालवताना मोबाइलमध्ये पाहत होती महिला मोटरमन, तितक्यात समोर ट्रेन आली अन्...; पाहा धक्कादायक VIDEO
Viral News: वाहन चालवताना मोबाइलचा (Mobile) वापर करु नका असं आवाहन वारंवार केलं जात असतानाही चालक मात्र याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करतात. दरम्यान ट्रेन चालवताना मोटरमन (Train Motorman) मोबाइलमध्ये व्यग्र असल्याने मोठी दुर्घटना झाल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
Viral News: वाहन चालवताना मोबाइलचा (Mobile) वापर करणं किती धोकादायक असतं याची सर्वांनाच कल्पना असते. वाहतूक पोलीस यासंबधी वारंवार आवाहन करत असतात. पण असं असतानाही अनेक लोक सर्रासपणे मोबाइलचा वापर करताना दिसतात. यामुळे होणारे अपघातही अनेकदा कॅमेऱ्यात कैद होतात. दरम्यान असाच एक अपघात सीसीटीव्हीत कैद झाला असून, यामध्ये ट्रेनची महिला चालक मोबाइलमध्ये व्यग्र असल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. हा जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) पुन्हा एकदा व्हायरल (Viral Video) झाला आहे.
ट्विटरला हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून याच्या माध्यमातून एक छोटासा हलगर्जीपणा किती महागात पडू शकतो हे दाखवण्यात आलं आहे. ही दुर्घटना रशियामध्ये ऑक्टोबर 2019 मध्ये घडली होती.
व्हिडीओत महिला ट्रेन चालवत असताना बिनधास्तपणे आपल्या मोबाइलचा वापर करताना दिसत आहे. महिलेचं पुढे ट्रॅकवर अजिबात लक्ष नसतं. पण त्याचवेळी ट्रॅकवर एक ट्रेन उभी असते. महिलेचं लक्ष खाली फोनमध्ये असल्याने तिला याची कल्पना नसते. पण जेव्हा ती पाहते तेव्हा ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न करते, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. ट्रेन दुसऱ्या ट्रेनवर जाऊन जोरात आदळते. पण सुदैवाने महिला चालकाल काही जखम होत नाही.
ही धडक इतकी जोरात होती की, व्हिडीओत मागील काही प्रवासी पुढे येऊन पडल्याचं दिसत आहे. त्यामुळे या अपघातात चालक वाचला असला तरी प्रवासी मात्र जखमी झाले होते. "Driving a train while on a smartphone" असं कॅप्शन या पोस्टला देण्यात आलं आहे.
या व्हिडीओला 1 कोटींहून अधिकांनी पाहिलं आहे. तसंच अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. एका युजरने म्हटलं आहे की, "जर फोन स्मार्ट असता तर त्याने तिला तात्काळ इशारा दिला असता. पण इतक्या वेगात असताना जर समोर एखादी गोष्ट येत असेल तर एखादा अलार्म का वाजत नाही? तिने नक्कीच लक्ष द्यायला हवं होतं. पण आजच्या तंत्रज्ञानाचा वापर करत असे अपघात टाळले जाऊ शकतात". तसंच एका युजरने ट्रेनमध्ये रडारवर आधारित ब्रेकिंग फिचर का नसतं? अशी विचारणा केली आहे.