मुंबई : आपल्याल तर हे माहित आहे की, सिंह, चित्ता आणि वाघ हे अतिशय धोकादायक प्राणी आहेत. त्यांच्यासमोर जर एखादा प्राणी आला की, त्याला आपलं भक्ष बनवल्याशिवाय सोडत नाही. मग तो लहान प्राणी असो किंवा एखादा मोठा प्राणी. सोशल मीडियावर वाईल्ड लाईफ संबंधीत अनेक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. जे मनोरंजक किंवा आपल्या हृदयाचे ठोके चुकवणारे असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो सगळ्यांना आश्चर्यचकित करत आहे.


कारण या व्हिडीओमध्ये वाघ, सिंह आणि कुत्रा एकमेकांसमोर आहेत. खरंतर या व्हिडीओमध्ये कुत्र्याला वाघासमोर पाहून तुम्हाला असे वाटेल की, आता कुत्र्याचं काही खरं, त्याचे प्राण वाचण्याची शक्यता फारच कमी आहे.


परंतु जर तुम्ही हा व्हिडीओ नीट पाहिलात, तर तुम्हाला हा व्हिडीओ थक्कं करेल, कारण यामध्ये वाघ हा कुत्र्याला घाबरताना दिसत आहे.


meemlogy नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, कुत्रा वाघाला कसा काय त्रास देऊ शकतो आणि वाघ कसं काय कुत्र्याला काहीच करत नाही.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आता हा वाघ कुत्र्याला का घाबरला हे नेमकं सांगणं कठीण आहे, परंतु हा वाघ पाळलेला किंवा प्राणीसंग्रालयातील असावा, ज्यामुळे त्याला शिकार करणं ठावूक नसावं. म्हणून त्याने कुत्र्याला काहीही केलं नाही असा अंदाज बांधला जात आहे.


त्याचवेळी शेजारी उपस्थित असलेला सिंहही या संपूर्ण प्रकरणात काहीच बोलत नाही. हा व्हिडीओ इतका जबरदस्त आहे की, त्याला आतापर्यंत 20 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर हजारो लोकांनी कमेंट केल्या आहेत.