मुंबई : जेव्हा एखादा कार ड्रायव्हर उलटी कार चालवण्यात आणि पार्किंग करण्यास सक्षम होतो तेव्हा आपण त्याला एक उत्कृष्ट किंवा उत्तम ड्रायव्हर आहे असे म्हणतो. तसेच जो व्यक्ती कमी जागेत कार पार्क करु शकतो किंवा कमी जागेतून कार काढू शकतो, तेव्हा तो एक उत्तम ड्रायव्हर असल्याचे आपण समजतो. सोशल मीडियावर असे अनेक कार ड्रायव्हिंग चे व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आपण अनेक ड्रायव्हरचे कौशल्य पाहिले आहे. कमी जागेत कार पार्कंग करण्याचे आणि कार काढायला शिकाण्याची इच्छा प्रत्येक ड्रायव्हरला असते. असाच एका ड्रायव्हरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याची चर्चा संपूर्ण इंटरनेटवर सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ न्यूयॉर्कचा आहे, जेथे एका माणसाची गाडी रस्त्याच्या कडेला उभी आहे. परंतु त्याच्या गाडीला लागून मागे पुढे दोन्ही बाजूला कार आहेत. त्या कारच्या मागे पुढे थोडीही जागा शिल्लक नाही. हे दृष्य पाहून तुम्हाला वाटेल की, यातून कार काढता येणे तर अशक्य आहे. आता हा व्यक्ती तर अडकला. याता याची कार काय जागची हलत नाही.


परंतु या महान चालकाने सगळ्यांचेच तोंड बंद केले आहे. कारण त्याने त्याच्या स्किल्सने या कारला बाहेर काढली आहे. तुम्ही विचार करा तुम्ही जर त्याच्या जागी असता तर, तुम्ही काय केले असते? अशा प्रसंगी कोणीही टेंशनमध्ये येतोच. परंतु या व्यक्तीने अगदी आरामात ही कार काढली, तो म्हणाला, "पाहा मी गाडी कशी बाहेर काढतो ते."


तो व्यक्ती हसत हसत कारमध्ये बसला आणि कार काढण्याच्या प्रक्रियेस सुरवात केली. तो कारला मागे करतो आणि मग हळूवारपणे स्टेअरिंग फिरवून पुढे करतो. परंतु हे लक्षात घेण्यासारखे आहे की, यामुळे पुढच्या किंवा मागच्या कोणत्याही कारचे काही नुकसान होत नाही. ना त्याला कोणता स्क्रॅच पडला आहे. या व्यक्तीला ब-याचदा गाडी मागे, पुढे करावी लागली, परंतु तरीही तो संयम राखून होता. त्यामुळे त्याने अगदी शांत पद्धतीने हळूहळू आपली गाडी बाहेर काढली.


परफेक्ट कार ड्रायव्हिंगचा हा व्हिडीओ लोकांना इतका आवडला आहे की, त्याला इन्स्टाग्रामवर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत, जे आता वाढतच जात आहेत. हा व्हिडीओ पीपल मासिकाच्या (people magzine) अधिकृत इन्स्टाग्रामवरून पोस्ट करण्यात आला आहे आणि एका दिवसात 27 लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.



हा व्हिडीओ पाहिल्यानंतर, लोकं यावर कमेंट्स करण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाहीत.