मुंबई : बरीचशी अशी लोकं आहेत जी संध्याकाळी समृद्रकिनाऱ्यावर फिरायला जातात. यादरम्यान त्यांना समुद्राच्या लाटांचा आणि सुर्यास्ताचा आनंद घेता येतो. शिवाय जोडीदार सोबत असेल, तर समुद्रकिनाऱ्याची ही संध्याकाळ फारच रोमांटिक होते. लोक संध्याकाळी भेळपुरी, चाट, गोळा, मका, नारळपाणी इत्यादी खाण्यापिण्याचा आनंद देखील घेतात. सध्या सेल्फी घेण्याचाही ट्रेंड असल्यामुळे बरेच लोक समुद्रकिनारी आपला सेल्फी देखील घेतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या समुद्र किनाऱ्यावरचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.


या व्हिडीओमध्ये काही लोक समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेले असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. यादरम्यान कोणी सेल्फी घेत होते, तर कोणी समुद्राच्या लाटांचे फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होते. दरम्यान, अचानक समुद्रात जोरदार लाट उसळली आणि....


जोरदार लाट आल्यानंतर पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, जोरदार लाट येत असल्याची दिसल्यामुळे तेथे उपस्थित सगळे लोक पळू लागले. मात्र, लाट इतकी जोरदार होती की, तेथून कोणीही पळून जाऊ शकलं नाही. एवढंच काय तर ती लाट इतकी मोठी होती त्यामुळे तेथील सगळेच लोक पाण्यामुळे ओले झाले.


व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लोक पाण्यापासून दूर राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. मात्र, त्यांना समुद्राची ती मोठी लाट लोकांना संपूर्ण भिजवते. यामुळे जे लोक आपली संध्याकाळी सुंदर बनवायला आलेले असतात, त्यांची संध्याकाळ मात्र पूर्ती पाण्यात जाते असंच म्हणावं लागेल.


बऱ्याच लोकांना हा व्हिडीओ खूपच मजेदार वाटला आहे, तर अनेकांना या लाटेच्या उंचीने घाबरवून टाकलं आहे, सोसल मीडियावर लोक या व्हिडीओला शेअर आणि लाईक्स करत आहेत.