Flight Viral Video : समजा तुम्ही फ्लाईनने प्रवास करत आहात अन् अचानक  प्लाईटचे दरवाजे उघडले तर... असाच प्रकार घडलाय, दक्षिण कोरियाच्या एशियाना एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये. प्रवास पूर्ण होण्याच्या काही मिनिटाआधी फ्लाइटमधील एका प्रवाशाने उड्डाणाचे आपत्कालीन एक्झिट गेट (Emergency exit gate) हवेतच उघडलं, अन् सर्वांची तारंबळ उडाली. सध्या या घटनेचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल (Viral Video) होत असल्याचं दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लँडिंगच्या काही वेळापूर्वी ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. त्यावेळी उड्डाण सुमारे 650 फूट उंचीवर होतं. सर्वांचा जीव टांगणीला टाकणाऱ्या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. आशियाना एअरलाइन्स या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत. एएफपीने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. एअरबस A321-200 मध्ये (South Korea flight) 6 क्रू मेंबर आणि 194 प्रवासी होते. त्यातील 9 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती स्थानिक वृत्तसंस्थांनी दिलीये.


आणखी वाचा - Viral Video: पठ्ठ्यानं बनवला अनोखा टी-शर्ट; Anand Mahindra झाले शॉक; ट्विट करत म्हणाले...


एअरबस A321-200  हे विमान राजधानी सेऊलपासून सुमारे 240 किमी दक्षिणपूर्व डेगू आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Daegu International Airport) उतरणार होतं. जेव्हा फ्लाइट हवेत सुमारे 200 मीटर (650 फूट) होते, तेव्हा त्याच्या आपत्कालीन एक्झिटजवळ बसलेल्या एका प्रवाशाने गेट उघडलं. इमर्जन्सी एक्झिट गेट (Emergency Exit) उघडल्याने वाऱ्याने कहर केला. त्यात विमान खाली उतरत असल्याने स्पीड जास्त होती. जोरदार वाऱ्यामुळे सर्व काही विस्कळीत होऊ लागल्याचे फुटेजमध्ये (Trending Video) दिसत आहे.


पाहा Video



समोर आलेल्या व्हिडिओमध्ये काही प्रवासी (flight Passengers) घाबरून ओरडताना दिसतात. अचानक फ्लाइटमध्ये स्फोट होणार आहे असं आम्हाला वाटलं. दाराजवळ बसलेले प्रवासी बेशुद्ध झाले, लहान मुले रडत होती. मोठ्यांना नक्की झालंय काय? हे कळत नव्हतं, असं विमानातील प्रवाशांनी सांगितलं आहे.


दरम्यान, अचानक दरवाजा उघडल्यामुळे काही प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास झाला. काही लोकांना उतरल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. कोणतीही मोठी दुखापत किंवा नुकसान झाले नसल्याची माहिती विमान कंपन्यांनी दिली आहे.