मुंबई : गर्भपाताच्या अधिकाराबाबत अमेरिकेत अनेक आंदोलनं सुरु आहेत. दरम्यान, एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. गेल्या मंगळवारी, सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एक 'अँटी-अॅबॉर्शन' कार्यकर्ता 60 मजली टॉवरवर चढताना दिसला. फॉक्स बिझनेसच्या अहवालानुसार, इन्स्टाग्रामवर मेसन डेशॅम्प्स  (Maison Deschamps) म्हणून ओळखल्या जाणार्‍या कार्यकर्त्याने स्वतःला 'प्रो-लाइफ स्पायडरमॅन' म्हणून वर्णन केले आणि त्याने स्वत:चा टॉवरवर चढतानाचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेसन डेसचॅम्प्स  (Maison Deschamps) हे आपल्या या व्हिडीओबद्दस सांगताना म्हणाले की, गर्भपात विरोधी संदेश देण्यासाठी त्यांनी अलीकडेच गगनचुंबी इमारतीवर चढण्यास सुरुवात केली. ज्याचा व्हिडीओ त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर देखील शेअर केला आहे.


खरंतर मेसन जेव्हा इमारतीवर चढत होता, तेव्हा त्याने स्वत:चा व्हिडीओ बनवला. शिवाय बिल्डिंगच्या आत असलेल्या लोकांनी देखील त्याचा व्हिडीओ काढला आहे. तसेच खाली उभ्या असलेल्या अनेक लोकांनी त्यांचा हा व्हिडीओ आपल्या फोनमध्ये शूट केला.


हा व्यक्ती इमारतीच्या बाहेरून 1,070 फूट वर चढला. व्हिडीओमध्ये, मेसन डेशॅम्प्स राखाडी रंगाचा हुडी, हातमोजे आणि पँट घालून इमारतीवर चढताना दिसत आहेत.



सॅन फ्रान्सिस्को पोलीस विभागाने ही माहिती दिली


सॅन फ्रान्सिस्को अग्निशमन विभागाने या व्यक्तीची सुटका करण्यासाठी अनेक ठिकाणी आपले कर्मचारी तैनात केले, कारण तो माणूस अग्निशामक आणि सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आणत होता. सॅन फ्रान्सिस्को पोलिस विभागाने सांगितले की, टॉवर चढण्याचे असे कृत्य केल्यानंतर, मेसन डेसचॅम्प्सला अतिक्रमण आणि अटकेचा प्रतिकार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.


अग्निशमन विभागाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'सेल्स फोर्स टॉवरमधील 60 मजल्यांच्या टॉवरवर चढणाऱ्या एका व्यक्तीने आश्चर्यकारक गोष्ट केली. ही व्यक्ती अग्निशमन दलाच्या जवानांचा जीव आणि जनतेची सुरक्षितता धोक्यात आणत आहे. त्यामुळे या भागात येण्याचे टाळा आणि या कृतीचा निषेध करा."


सुमारे एक तासानंतर, अग्निशमन विभागाने एक अद्यतन जारी केले की, समस्येचे निराकरण झाले आहे आणि संबंधित व्यक्ती सॅन फ्रान्सिस्को पोलिसांच्या ताब्यात आहे.