Destination Wedding : नवरदेवाने शॉट्समध्ये, तर वधूने चक्कं बिकनीत केलं लग्न... पाहा व्हिडीओ
आजकाल सोशल मीडियावर तुम्हाला सगळीकडेच लग्नाचे व्हिडीओ पाहायला मिळत आहे.
मुंबई : आजकाल सोशल मीडियावर तुम्हाला सगळीकडेच लग्नाचे व्हिडीओ पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस एकापेक्षा एक वरचढ लग्न तुम्ही पाहिले असतीलच. मग ते कोणत्याही जाती-धर्माचे असो, आपण मनोरंजन म्हणून असे लग्नाचे व्हिडीओ पाहातो आणि पोट धरुन हसतो. लग्नाचे काही व्हिडीओ खरोखरचं इतके विनोदी असतात की, ते पाहिल्यावर तुम्हाला तुमचे हसू आवरणार नाही.
सध्या जो सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो सगळ्यांपेक्षा खूप वेगळा आणि अनोख्या लग्नातला आहे, जो पाहिल्यांने काही लोकांना प्रश्व देखील पडला आहे की, असं देखील लग्न कधी असू शकतं का?
आजकाल लोकांमध्ये डेस्टीनेश आणि थीम वेडिंगचा खूप क्रेझ आहे. यामध्ये वधू-वरांसोबत नवीन लूक आणि गेटअप करुन नवीन ठिकाणी लग्न करायला आणि लग्नाला जायला आवडतं. प्रत्येकाला हा लग्नाचा विशेष दिवस सर्वात खास असावा आणि त्याची सर्वत्र चर्चा व्हावी असे वाटत असते. त्यामुळे या कपलने देखील तसा विचार केला असावा, ज्यामुळे खरोखरच सर्वत्र त्यांनी चर्चा सुरु आहे.
हे थीम लग्न समुद्राच्या मध्यभागी करण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये वधू आणि वर त्यांचे मित्र परिवारासह समुद्राच्या मध्यभागी असलेले दिसत आहेत. येथे वधू वरासोबत कुत्रे देखील उपस्थिती आहेत. या लग्नात सर्वांचा लूक पाहण्यासारखा आहे.
लग्नात उपस्थित सर्व लोकं बोटीवर बसलेले दिसत आहेत. वधू -वर देखील बोटीवर बसले आहेत आणि लग्नाचे विधी पार पाडत आहेत. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, नवरदेव हा काळ्या शॉर्ट पॅन्टमध्ये आहे तर नववधू सफेद रंगाच्या बिकनीत आहे. हे कपल समुद्रात स्विमिंग सुटमध्ये मित्र परिवारासह लग्न करत आहेत.
हा व्हिडीओ दुल्हनिया नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला गेला आहे. सोशल मीडियावर लोकांना समुद्रात लग्न करण्याचा हा व्हिडीओ खूप आवडला आहे.
हे लग्न तसे बाहेरील देशातील आहे. त्यामुळे तेथील लोकांसाठी असे स्विमिंगच्या कपड्यात लग्न करणं किंवा एकमेकांना पाहाणं तसं नवीन नाही. परंतु काही भारतीयांना मात्र हा व्हिडीओ पाहून अनेक प्रश्न पडले असावेत. कारण भारतात असं घडणं किंवा अशा पद्धतीनं कोणी लग्नाचा विचार देखील करणार नाही. या व्हिडीओला देशभरातून वेगवेगळे कमेंट्स आले आहे. काहींना अशी लग्न करण्याची पद्धत खूप आवडली, तर काही लोकांनी या कपलला ट्रोल देखील केलं आहे.