2 सेकंद किती महत्त्वाचे असतात ते हा VIDEO पाहून समजेल
सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल की, या व्यक्तीचं नशिब तगड आहे.
Viral Video: आता आपण अशा व्हिडीओबद्दल बोलू जो पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकून जाईल. हा व्हिडीओ पाहिल्यावर एकच म्हणं आठवते 'जाको रखे सैया मार सके ना कोई'. असाच काहीसा प्रकार या व्हिडीओमधील व्यक्तीसोबत झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ हृदय पिळवटून टाकणारा आहे. अनपेक्षित आयुष्यात अशी घटना घडतात की ज्याचा कधी आपण स्वप्नातही विचार केला नसतो. पण अनेक वेळा नशिबाची साथ असेल तर अनेक घटना टळल्या जातात. सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल की, या व्यक्तीचं नशिब तगड आहे.
काय घडलं 'या' व्यक्तीसोबत?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या कारजवळ उभा असतो आणि आपल्या कारवरील बर्फ साफ करत असतो. परिसरात झालेल्या बर्फवृष्टीमुळे त्याचा कारवर बर्फाची चादर पसरली होती. तो गाडीवरील बर्फ साफ करत होतो तेवढ्यात काही तरी त्याचा गाडीवर पडतं. म्हणून तो वरती पाहतो आणि क्षणात त्याचा गाडीवर एक भयानक गोष्ट पडते. तो बाजूला धावून जातो. त्यामुळे सुदैवाने या घटनेत त्या व्यक्तीचे प्राण वाचतात. ज्या वेळी गाडीवर ही वस्तू पडते गाडीच्या चिंध्या उडून जातात. या व्हिडीओमधील अपघात बघून अनेक यूजर्सला धक्का बसतो.
भयानक अपघाताचा व्हिडीओ व्हायरल
हा भयानक अपघाताचा व्हिडीओ nftbadger नावाच्या ट्विटर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर आतापर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. तर 3 हजारांपेक्षा जास्त यूजर्सने तो लाइक केला आहे. तसंच हा व्हिडीओ पाहून यूजर्सने वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक यूजर म्हणतो की, ''कारचे इंजिन सुरक्षित असून त्यावर पडलेला तुकडा काढा आणि गाडी चालवायला जा.'' तर दुसरा यूजर म्हणतो की, ''या व्यक्ती प्राण हे चमत्कारिकरित्या वाचले आहे, कल्पना करा की जर ती व्यक्ती ड्रायव्हिंग सीटवर बसली असती कर काय झालं.