orca whale hunting video : तुम्ही कधी एखाद्या माशाला शिकार करताना पाहिलंय का? पाहिलंही असेल. अनेक नावाजलेल्या वाहिन्यांनी आजवर त्यांच्या विविध कार्यक्रमांतून आणि माहितीपटातून या अनोख्या विश्वाची सफर आपल्याला घडवली आहे. किंबहुना काही चित्रपटांच्या माध्यमातून शार्क किंवा तत्सम माशांच्या एकंदर स्वभावाची कल्पना आपल्याला आली आहे. पण प्रत्यक्षात कधी एखाद्या महाकाय माशाची शिकार पाहिलीय का? सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये ही दृश्यसुद्धा पाहायला मिळत असून, ती पाहताना अंगावर काटाच येतोय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

natgeotv नं काही दिवसांपूर्वीच त्यांच्या आगामी सीरिजच्या निमित्तानं एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी एका अशा जलचरावर प्रकाश टाकला ज्याच्या शिकारीच्या पद्धत आणि तंत्रानं अनेकांना हैराण केलं आहे. ही प्रजाती आहे ओर्का व्हेल. देवमाशाच्याच विभागात येणारी ही प्रजाती त्यांच्या आक्रमक शिकारीच्या शैलीसाठी ओळखली जाते आणि धडकीही भरवते. 


अंटार्क्टिकामध्ये या प्रजातीच्या माशांचा मोठा वावर असून, अधिकृत आकडेवारीनुसार आतापर्यंत जगात 100 ओर्का व्हेल मासे असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. (आकडा कमीजास्त असू शकतो) ओर्का व्हेल हे त्यांच्या रुपासोबतच आपापसातील अप्रतिम ताळमेळासाठी ओळखले जातात. एखाद्या संगणकीय सूत्रालाही लाजवेल अशी शक्कल आणि तंत्र हे मासे शिकारीच्या वेळी आजमावतात. 


हेसुद्धा वाचा : Kim jong un यांच्या उत्तर कोरियामध्ये केस कापण्यापासून मायक्रोवेव बंदीपर्यंतचे अजब कायदे


 


याचविषयी सांगताना त्यांची शिकार करण्याची एक कमालीची आणि प्रचंड ताकदीची पद्धत तुम्हाला अवाक् करून सोडेल, असं जाणकार म्हणताना दिसतात. एकमेकांशी सुरेख ताळमेळ साधत हे मासे गोठलेल्या समुद्रात बर्फाच्या मोठमोठ्या तुकड्यांवर स्थिरावलेल्या सील माशांना शोधतात आणि इथं पाण्याचाच शस्त्र म्हणून वापर करतात. जेणेकरून हा सील मासा बर्फाच्या तुकड्यावरून थेट समुद्रातील गोठवणाऱ्या पाण्यात पडेल. 



इंग्रजीत या तंत्राला 'वेव वॉशिंग' (Wave Washing) असं म्हटलं जातं. बी1 ओर्का व्हेल ही जगातील अशी एकमेव प्रजाती आहे जी हे तंत्र वापरून शिकार करताना दिसते. शिकारीसाठी हे महाकाय व्हेल मासे आणखी एका तंत्राचाही वापर करतात जिथं दोन मोठे व्हेल (पाठीवर बाक असणारे) त्यांच्या थव्यातून मागं राहत बर्फाचे तुकडे तोडण्यास सुरुवात करतात. आपल्या साथीदारांना वाचवण्यासाठी माशांकडून वापरलं जाणारं हे तंत्र समुद्रविषयक अभ्यास करणाऱ्या संशोधक आणि जाणकारांनाही हैराण करून सोडतं.