Pakistani Actress Resham : प्रत्येक कलाकाराच्या प्रसिद्धीचे निकष वेगवेगळे असतात. काही मंडळी त्यांच्या सौंदर्यामुळे, काही अभिनयामुळे आणि हल्ली तर काही कलाकार त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत येत असतात. पाकिस्तानी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री रेशम सुद्धा त्यातलीच एक. (Pakistani Actress Resham) तिच्या अभिनयामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. 90 च्या दशकात त्यांच्या अभिनयाने सगळ्यानांच भुरळ पाडली होती. 


सध्या चित्रपटांमध्ये कमी झळकत असली तरीही, रेशम समाजातील गरीब वर्गाला मदत करण्यासाठी कायमच पुढे असते. सामाजिक कामांत हातभार लावण्यात तिची (Social Work) महत्वाची भुमिका पाहायला नेहमीच मिळते. 


काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील पूरग्रस्तांना मदत करतानाचे त्यांचे व्हिडीओही प्रचंड व्हायरल (Viral) झाले. हे सर्व ठीक. पण, समाजातील घटकांसाठी आदर्श असणाऱ्या याच रेशमकडून एक चूक झाली आणि तिच्यावर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली.


आता बोंबला! T20 World Cup प्लेइंग XI 11 वर पाकिस्तानच्या स्टार खेळाडूनेच घेतला आक्षेप


नेमकं झालं तरी काय?


रेशमचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल झालेला पाहायला मिळेल. पाकिस्तानमधील चारसड्डामध्ये ही घटना घडली. पूरग्रस्तांना मदत करून परतत असताना तिने नदीकाठी थांबून माशांना खायला दिलं.


व्हिडीओत रेशम ब्रेडचे तुकडे पाण्यात टाकताना दिसते. रेशमनं माशांना खायला घातल्यानंतर ब्रेड असणारी Plastic Bag सुद्धा पाण्यात फेकली. 


बस्स... मग काय, पाहणाऱ्यांनी तिची ही चूक हेरली आणि कडाडून टीका करण्यास सुरुवात केली. 'मॅडम दिखावा करु नका', 'प्रत्येक कामाचा दिखावा करु नये म्हणूनच असे म्हटले जाते', 'तुमच्याकडून खुप गंभीर चुक झाली आहे' अशा एक ना अनेक कमेंट्स तिच्या या व्हिडोला अनुसरून करण्यात आल्या. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Irfanistan (@irfanistan)


रेशमने मागितली युजर्सची माफी


होणारा विरोध आणि आपल्याकडून झालेली चूक रेशमनं मान्य केली आणि सोशल मीडियावर माफी मागितली. 'माझ्या करिअरमधील ही सर्वात मोठी चुक आहे', असं तिनं म्हटलं. ज्या युजर्सनी आपल्याला ट्रोल केलं त्यांना हे देखील सांगितलं की समाजात


सामुहिक बलात्कार, बेराजगारी असे बरेचसे मुद्दे आहेत तिथं कोणाचं लक्ष नाही, नकळत घडलेल्या चुकांसाठी मात्र सगळे ट्रोल (Troll) करायला तयार असतात असं म्हणत तिनंही संधी साधली.