Airplane Viral Video: विमानातील प्रवाशाच्या लघुशंकेनंतर अनेक प्रकरणे समोर आलीत. प्रवासी आणि पायलेटमधील वाद असो किंवा प्रवासी आणि एअर होस्टची बाचाबाची असो. विमान प्रवासादरम्यानचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात. काही व्हिडीओ खूप धक्कादायक आणि मन विचलित करणारे असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विमान अपघातासंदर्भातील व्हिडीओ अतिशय भयानक आणि धक्कादायक असतात. सोशल मीडियावर असाच एक विमानातील व्हिडीओ नेटकऱ्यांची झोप उडवतं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 


किंचाळ्या, आरडाओरड अन् धूर...


हजारो फूट उंचीवर आकाशातून विमान जात असताना जर एखादी घटना घडल्यास अशा वेळी काय करणार अशा प्रश्न अनेक वेळा प्रवाशांना पडतो. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, विमानात धुरीचं साम्राज्य पसरलं आहे. प्रवाशी घाबरलेले आहेत त्यामुळे त्यांचा किचाळ्या आरडाओरडण्याचा आवाज येतं आहे. 


अंगावर काटा आणणारा व्हिडीओ 


हा व्हिडीओ पाहून प्रत्येकाच्या अंगावर काटा येतं आहे. या धुरामुळे काही प्रवाशांची तब्येत बिघडलेली आहे. तांत्रिक बिघाडामुळे ही परिस्थती निर्माण झाली आहे. विमानातील प्रवासी मृत्यू उघड्या डोळ्यांनी समोर पाहत आहेत. हा क्षण कधी न विसरण्यासारखा आहे. 



अन् प्रवाशांचा जीव वाचला...


दरम्यान पायलटच्या प्रसंगावधानामुळे विमान सुरक्षितरित्या जमिनीवर उतरविण्यात आलं आणि प्रवाशांच्या जीवात जीव आला. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवरील OddIy Terrifying या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 1 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.