मासे पकडता पकडता त्याच्या जाळ्यात सापडलं असं की…, पाहून तुम्हालाही बसेल धक्का!
त्याचा हातात असं काही लागलं की, त्याचा त्याचाच डोळावर विश्वास बसत नव्हता. लाखात एक अशी ही गोष्ट त्याचा हाती लागली होती.
viral video - प्रशांत महासागरात अनेक रहस्यमय गोष्टी लपलेल्या आहेत. तसंच असंख्य असे दुर्मीळ जीव-जंतू, किडे आणि जलचर प्राणी राहत आहेत. ते आपल्याला माहिती पण नसतात किंवा कधी दिसत पण नाहीत. अनेक वेळा अचानक रहस्यमय गोष्टी समुद्राच्या कुशीतून बाहेर येतात. ते पाहून अनेक जण दंग होऊन जातात. असंच एका मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छीमारासोबत घडलं. त्याचा हातात असं काही लागलं की, त्याचा त्याचाच डोळावर विश्वास बसत नव्हता. लाखात एक अशी ही गोष्ट त्याचा हाती लागली होती.
लाखात एक अशी गोष्ट
हा भाग्यवान मच्छीमार अमेरिकेतील पोर्टलँडमधील वाला लार्स जोहान आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा हातून एक अद्भूत रहस्यचा उलगडा झाला. मच्छीमारीसाठी गेला असता त्याचा जाळ्यात एक निळ्या रंगाचा झिंगा अडकला. असं म्हणतात हा निळा रंगाचा झिंगा दोन दशलक्षांपैकी एक आहे. या झिंगाची संख्या खूप कमी असून याची प्रजाती पण खूप दुर्मिळ आहे. या निळ्या रंगाच्या झिंगाला बघून मच्छीमाराला काही सुचत नव्हतं.