बँकॉक : एक असे प्रकरण समोर आले आहे, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. एका उंच इमारतीत राहणाऱ्या एका महिलेने रागाच्या भरात उंच इमारती बाहेर लटकलेल्या दोन पेंटरचे दोर कापले कारण त्यांनी त्या दिवशी ते काम करणार आहेत हे कळवले नव्हते. एवढेच नाही तर या महिलेनं या व्यक्तीला 26 व्या मजल्यावर लटकतंच सोडून दिलं आणि यांच्यासोबत काय घडलं हे पाहिलं देखील नाही.


महिलेनं रागाच्या भरात कामगारांची दोरी कापली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थायलंडच्या राजधानीच्या उत्तरेकडील पाक क्रेट पोलिस स्टेशनचे प्रमुख पोल कर्नल पोंगजाक प्रीचकरुनपोंग यांनी स्थानिक मीडियाला सांगितले की, महिलेवर हत्येचा प्रयत्न आणि मालमत्तेचा नाश केल्याचा आरोप लावला गेला आहे.


या महिलेचं नाव पोंगजॅक आहे. या महिलेनेच ती दोरी कापली हे मान्य केले नाही, परंतु थाई मीडियाने सांगितले की, जेव्हा कामगार तिच्या खोलीबाहेर दिसले तेव्हा ती खूप चिडली होती. हे कामगार 12 ऑक्टोबरला काम करतील, असे या महिलेला आधी सांगण्यात आले नव्हते. ज्यामुळे ती यांच्यावर चिढली होती.


32 व्या मजल्यावर कामगार इमारतीची दुरुस्ती करत होते


सोशल मीडियावरती व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन पेन्टर उंच इमारतीबाहेर हवेत लटकत आहेत. त्यानंतर या दोन पेन्टरना 26 मजल्यावरील खिडकीतून आत येण्यास सांगितले, ज्यानंतर त्यांचा जीव वाचला आहे.


म्यानमारचा रहिवासी असलेल्या पेंटर सॉन्गने थाई मीडियाला सांगितले की, तो आणि त्याचा दोन मित्र 32 व्या मजल्यावरील इमारतीतील इमारत दुरुस्त करण्यासाठी आणि रंगवण्यासाठी आले होते.



महिला न्यायालयात हजर


या पेन्टरसह कॉन्डो व्यवस्थापनाने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. या 34 वर्षीय महिलेने या घटनेसाठी प्रथम स्वत: ला जबाबदार धरण्यास नकार दिला, परंतु पोलिसांनी तुटलेल्या दोरीवरीलव बोटांचे ठसे आणि डीएनए फॉरेन्सिकसाठी पाठवले. ही घटना धक्कादायक आहे. नशीबाने या दोन्ही पेंटरचा जीव वाचला आहे.


पोलिसांनी जेव्हा सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक पुरावे दाखवले तेव्हा या महिलेनच हे सगळं केलं असल्याचं उघड झालं. त्यानंतर महिलेनं गुन्हाची कबुली दिली परंतु ती पुढे म्हणाली की, कामगारांना मारण्याचा तिचा कोणताही हेतू नव्हता. त्यामुळे या महिलेनं हा हत्येसाठी कट रचला होता हे काही सिद्ध झाले नाही.


पोलीस १५ दिवसांत प्रांतिक न्यायालयात आरोपपत्र दाखल करतील. खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपात ही महिला पूर्णपणे दोषी ठरल्यास तिला 20 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.