Viral Video : रेल्वे प्लॅटफॉर्मवरुन (Railway Platform) एकदा का ट्रेन (Train) सुटली की धावती ट्रेन पकडणं मोठं दिव्यच असतं. यासाठी ट्रेनने प्रवास करणारे प्रवासी वेळेच्या आधीच प्लॅटफॉर्मवर येऊन उभे रहातात. पण सध्या सोशल मीडियावर (Social Media) एका तरुणाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. एक तरुण ट्रेनमधून एका रेल्वे स्टेशनवर उतरतो आणि धावत सुटतो. त्यानंतर त्याच ट्रेनमध्ये तो पुढच्या रेल्वे स्टेशनवर (Railway Station) चढतो. हा व्हिडिओ (Video) पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. ट्रेनच्या वेगाशी बरोबरी करणाऱ्या या तरुणाचं कौतुक होत आहे. (boy ran to catch same train in next railway station)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ
हा व्हिडिओ पाहून युजर्स त्या तरुणाची उसेन बोल्टबरोबर (Usain Bolt) तुलना करत आहेत. व्हायरल होणारा हा व्हिडिओ लंडनमधला आहे. मेट्रोच्या (Metro Railway) एका रेल्वे स्टेशनवर येऊन ट्रेन थांबते. मेट्रोचा दरवाजा उडताच, तो तरुण वेगाने धावत सुटतो. त्या स्थानकातून बाहेर पडल्यानंतर तो रस्त्याने धावत मेट्रोचं पुढचं रेल्वे स्टेशन गाठतो. मेट्रो जशी पुढच्या स्थानकावर पोहचते आणि दवाजा उघडतो तसा तो तरुणही धावत येत त्याच ट्रेनमध्ये पुन्हा चढतो. या तरुणाच्या मित्राने याचं व्हिडिओ शुटिंग केलं आहे. 


तरुणाच्या वेगाचं कौतुक
तसं पाहिलं तर ट्रेनच्या वेगाशी स्पर्धा करणं कधी कधी चार चाकी गाडीने अशक्य असतं. पण या तरुणाने वेगाने धावत ट्रेनशी स्पर्धा केली. नुसतीच स्पर्धा नाही तर ट्रेनच्या तो एक पाऊल पुढेच राहिलाय. पुढच्या रेल्वे स्टेशनला त्याच ट्रेनमध्ये तरुणाला डब्यात चढताना पाहून डब्यातील इतर प्रवासीही अवाक झालेले व्हिडिओ पाहिला मिळतायत. त्या तरुणाचा आणि मेट्रोच्या वेगाची आता तुलना केली जात आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओला तब्बल 47 मिलियनपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. 



कपलचा व्हिडिओ व्हायरल
दरम्यान, सोशल मीडियावर एका कपलचा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. एक तरुण मुलगी (GirlFriend) आपल्या बॉयफ्रेंडला (Boy Friend) खांद्यावर उचलून घेऊन जाताना दिसत आहे. न्यू यॉर्क पोस्ट (NY Post) दिलेल्या वृत्तानुसार या तरुणीचा बॉयफ्रेंड मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याला चालताही येत नव्हतं. शुद्ध हरपलेल्या बॉयफ्रेंडला घरी कसं घेऊन जावं, असा प्रश्न या तरुणीला पडला होता. शेवटी तीने त्याल थेट खांद्यावर उचलून घेतलं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तीस लाखहून अधिक वेळा पाहिला गेलाय.