बिटकॉईनबद्दल वॉरेन बफे काय म्हणतात...
जर बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केली असेल तर सावध, बफे म्हणतात हे एक मायाजाल आहे.
नवी दिल्ली : जर बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केली असेल तर सावध, बफे म्हणतात हे एक मायाजाल आहे.
बिटकॉईनचं मायाजाल
सध्या गुंतवणूकीच्या जगात बिटकॉईन ही प्रचंड गाजणारी संकल्पना. तर वॉरेन बफे हा गुंतवणूकीच्या दुनियेचा बादशाह. नुकताच वॉरेन बफेंनी बिटकॉईनच्या संदर्भात एक खुलासा केला. हे एक मायाजाल असून हा फुगा केव्हाही फूटू शकतो, असा इशारा बफे यांनी गुंतवणूकदारांना दिला आहे.
बफे म्हणतात लांब राहा
बफे यांच्या मते, क्रिप्टोकरंसी ही अधिक काळ टिकू शकणार नाही. ते स्वत:देखील या प्रकारात गुंतवणूक करत नाहीत. यात गुंतवणूकदारांना मोठं नुकसान होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. भारत सरकारनेसुद्धा या बाबतीत सूचना देत धोक्याची घंटा वाजवली आहे.
जगभरात धोक्याची घंटा
एकीकडे क्रिप्टोकरंसी यशस्वी होत असताना जगभरात मात्र याविषयी धोक्याची घंटा वाजवण्यात येते आहे. भारतासकट अनेक देशांत याला कायदेशीर मान्यता देण्यात आलेली नाही. दक्षिण कोरियाने बिटकॉईनवर बंदी घातलेली आहे.