मुंबई : Desi Jugaad : आपण अनेकदा विवाहसोहळ्यांमध्ये पाहिले असेल की डान्स करताना हवेत पैसे उडविले जातात किंवा नव वधु-वरांच्या अंगावरुन ओवाळून काढले जातात. तेथे उपस्थित बहुतेक मुले आणि ढोल-ताशा वाजवणारे लोक हे पैसे पकडण्याचा प्रयत्न करतात. आताच्या काळात मात्र हे फार क्वचितच पाहायला मिळते. दरम्यान, एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका कारमध्ये जात असलेली एक व्यक्ती हवेत खूप पैसे उडवत आहे. त्याचवेळी डझनभर लोक ते पैसे जमा करत आहेत. त्यासाठी काहींनी भन्नाट आयडिया लढवली आहे.


हवेतील पैसे पकडण्यासाठी धडपड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पैसे लुटण्यासाठी लोक हवेत उडी मारतात किंवा एकमेकांना हिसका मारता. पण इथे काहीतरी वेगळं दिसलं, जेव्हा गाडीने जाणारे काही लोक हवेत पैसे उडवत होते. गर्दीत काही लोक ते पकडण्यासाठी प्रयत्न करत होते. ज्यांनी एक अद्भुत देसी जुगाड करत हवेतील पैशाची लूट करण्यासाठी असं काही केलं की याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.



मोठी जाळी अर्थात घोळ तयार करत पैसे जमविले


पैसे लुटण्यासाठी त्या व्यक्तीने एक मोठा घोळ तयार केला आणि एकाच वेळी जास्तीत जास्त पैसे या जाळ्यात गोळा केले. ज्यांच्याकडे असे सापळे नव्हते त्यांनी काही नोटा पकडल्या तर जुगाड असलेल्या व्यक्तीने त्यांच्याकडील घोळात जास्त नोटा गोळा केल्या. हा व्हिडिओ इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे. हे इंस्टाग्रामवर शानू खान नावाच्या अकाउंटवर हा व्हिडिओ अपलोड केला गेला आहे. 1 लाख 30 हजाराहून अधिक लोकांनी व्हिडिओ लाईक केला आहे.