मुंबई: नाही म्हटले तरी, थराराचे प्रत्येकालाच आकर्षण. फरक इतकाच की, थरार अनुभवण्याच्या पद्धती ज्याच्या त्याच्या वेगळ्या. त्यामुळे थरार अनुभवताना योग्य ती काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे. थराराच्या वेळी योग्य ती काळजी घेतली नाही, तर, काय होते याचा अनुभव एका महिलेला आला. ही महिला स्कायडायव्हिंग करत होती. दरम्यान, हवेचा तीव्र झोत असतानाही ती सतत तोंड उघडे ठेवत होती. हासत होती. परिणामी व्हायचे तेच झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यट्यूबवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहता या महिलेची बत्तीशी (सर्व दात) हवेत उडाली. ही महिला स्कायडायव्हिंगचा थरार अनुभवत होती. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहाल तर तुमच्या ध्यानात येईल. थरार अनुभवताना योग्य ती काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे. अन्यथा कसे त्रासाला सामोरे जावे लागू शकते....