मुंबई - कुठल्याही देशाची किंवा शहराची ओळख त्याचा नावात असते. जेव्हा आपण रेल्वेने प्रवास करतो, आपल्याला आकर्षित आणि मजेशीर अशी स्टेशनची नावं दिसतात. काही नावं तर अशी असतात की आपल्याला हसू फुटतं. तर काही नाव हे वाचणं देखील कठीण असतं मग प्रश्न असा उपस्थीत होतो की ही अशी नावं ठेवतं तरी कोण? ती कुठून येतात?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज आम्ही तुम्हाला असं स्टेशनचं नाव सांगणार आहोत, जे वाचायला किंवा उच्चारायला अशक्य आहे. आता तुम्हाला उत्सुक्ता निर्माण झाली असेल की, हे नाव नक्की आहे तरी काय? चला बघू या तुम्हाला हे नाव वाचायला किंवा उच्चाराला जमतं का?


हे एक चॅलेंज आहे, तुम्हाला जर हे नाव वाचून दाखवता आलं तर, तुम्ही खुपच हुशार किंवा स्मार्ट आहात म्हणून समजा आणि हेच नाव वाचण्याचं चॅलेंज तुमच्या मित्र-मैत्रीणींना द्या आणि पाहा त्यांना ते वाचता येतंय का?


या हिल स्टेशनचं नावं चक्कं 85 अक्षरी आहे


TAUMATAWHAKATANGIHANGAKOAUAUOTAMATEATURIPUKAKAPIKI-MAUNGAHORONUKUPOKAIWHENUAKITNATAHU.



हो, हे एका हिल स्टेशनचे नाव आहे. न्यूझीलॅंडमधील उत्तरी आयरलँडच्या एका रेल्वे स्टेशनचं हे नाव आहे. हे नाव काही केल्या वाचता येत नाही. मग इथे जायचं कसं किंवा स्थानिक लोकं काय सांगतात हिल स्टेशनचं नाव? तर स्थानिक लोकं टॉमेटा किंवा टॉमेटा हिल असं या स्टेशनचं नाव घेतात.


आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे येवढं मोठं नाव ठेवण्यामागे लॉजिक तरी काय आहे.  असं म्हणतात की, हे नाव एका वीर सैनिकांच्या नावावर ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या स्टेशनचं नाव गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड रिकॉर्डमध्येही नोंदविण्यात आलं आहे.