महाकाय व्हेलने बोट पलटवली! प्रवाशी समुद्रात फेकले गेले; घटना कॅमेरात कैद, पाहा Video
Whale Attack Boat Overturned It In To Sea: सा संपूर्ण घटनाक्रम जवळच असलेल्या अन्य एका बोटीवरील व्यक्तीने कॅमेरामध्ये कैद केला असून सध्या हा व्हिडीओ चर्चेत आहे.
Whale Attack Boat Overturned It In To Sea: जंगली प्राण्यांनी मानावर केलेले हल्ले काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. त्यातच आता मोठ्याप्रमाणात शहरीकरण वाढल्याने अनेकदा मानव आणि जंगली प्राण्यांमधील संघर्ष होताना दिसतो. यामध्ये कधी प्राण्यांना प्राण गमावावा लागतो तर कधी माणूस त्यास बळी पडतो. वाघ, बिबटे, हत्तींबरोबरच मगरींनी केलेल्या हल्ल्यांच्या बातम्याही तुम्ही वरचेवर ऐकल्या, वाचल्या किंवा बातम्यांमध्ये पाहिल्या असतील. मात्र इंग्लंडमध्ये चक्क एका व्हेल माश्याने बोटीवर हल्ला करुन बोट समुद्रात उलटवल्याचा प्रकार घडला आहे. हा सारा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.
कुठे घडला हा प्रकार?
इंग्लंडमध्ये एका व्हेल माश्याने माणसांनी भरलेली बोट उलटवल्याचा प्रकार घडला आहे. येथील हॅम्पशायरमधील पोर्ट्समाऊथ बंदराजवळ हा खळबळजनक प्रकार घडला आहे. बाजूच्या बोटीवरील व्यक्तींना हा सारा घटनाक्रम आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. या व्हेलने केलेला हल्ला पाहून इतर बोटींनी तिथून दूर जाणं पसंत केल्याचंही व्हिडीओतून दिसून येत आहे.
बोटीवरील माणसं समुद्रात पडली
समोर आलेल्या माहितीप्रमाणे, हा प्रकार सोमवारी म्हणजेच 22 जुलै 2024 रोजी घडला आहे. हम्पबॅक प्रजातीचा व्हेल मासा हा पिस्काताक्युआ नदीच्या मुखाजवळून न्यू हॅम्पशायर आणि माईनदरम्यानच्या सीमेवरुन पुढे जात होती. अचानक या व्हेल माश्याने पाण्यातून बाहेर उसळी घेतली आणि या माशाच्या शरीराचा काही भाग समुद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या छोट्या मासेमारी करणाऱ्या बोटीला आदळला. या धक्क्यामुळे बोटीवरील दोन मासेमार समुद्रात पडले.
कधीच असा हल्ला करत नाही व्हेल मासे पण...
सामान्यपणे समुद्रामध्ये शार्क माश्यांकडून माणसांवर हल्ला होतो. व्हेल मासे हे जगातील सर्वात मोठे सस्तन प्राणी असले तरी ते अशाप्रकारे कधीच बोटींवर हल्ला करत नाहीत. पण हा घडलेला प्रकार म्हणजे योगायोग असल्याचंही म्हटलं जात आहे. माशाने पाण्यातून बाहेर उडी मारली त्याचवेळी मासेमारी करणारी बोट तिथे असल्याने माशाच्या आकारामुळे बोटीला तडाखा बसला आणि बोट पाण्यात पडली. या बोटीवरील दोन्ही मासेमार सुरक्षित असल्याची माहिती समोर येत आहे.
अवघ्या सात सेकंदांचा हा बोटीवर व्हेलने हल्ला केल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.