मुंबई : मृत्यू झाल्यावर नेमकं आपल्यासोबत काय होतं, असा प्रश्न अनेकांना पडतो. पण आजपर्यंत मृत्यूनंतर नेमकं होतं तरी काय हे कोणालाही सांगता आलेलं नाही. चित्रपटात आपण पाहतो मृत्यूनंतर यमराज येतो आणि आपला आत्मा घेऊन जातो. पण ही सगळी काल्पनिक दुनिया आहे.  खऱ्या आयुष्यात मृत्यूनंतर काय होतं हे सांग अशक्य आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रश्नाचं उत्तर जगातील प्रत्येकाला जाणून घेण्याची उत्सुकता आहे. यावर काही संशोधक संशोधनही करत आहेत. मरणाच्या दारातून परत आलेल्या काही व्यक्तींच्या अनुभवावर या संशोधनातून अभ्यास केला जात आहे. या व्यक्तींनी सांगितलेले अनुभव नक्कीच थक्क करणारे आहेत.


'मी खाली एका छिद्रातून खाली पडत होतो'



एका व्यक्तीने सांगितलं, 'मी क्लासमध्ये प्रझेंटेशन देत असताना चक्कर येऊन पडलो. त्यावेळी माझा श्वास आणि रक्तप्रवाह थांबला. मला असं जाणवलं की, मी एका खोल छिद्रातून खाली पडत आहे आणि माझे सहकारी माझ्या मदतीसाठी रडत आहेत. जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा मी मृत्यूला हात लावून परत आलो होतो. त्यानंतर मला काही आठवत नाही. बस मी एक स्वप्न पाहत होतो असं वाटतं होतं.


'एका प्रकाशमय भिंतीसमोर उभा होतो'



आणखी एका व्यक्तीनं आपला अनुभव  सांगितला आहे. यात तो म्हणतो 'मी फेब्रुवारी 2014 मध्ये ऑफिस मीटिंग सुरु असताना अचानक खाली कोसळलो. 5 मिनिटांसाठी हार्ट रेट आणि पल्स बंद पडली होती. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार मी कोमामध्ये गेलो होतो. त्यावेळी मी जे काही अनुभवलं ते अद्भूत होतं.


माझ्या डोळ्यासमोर एक प्रखर प्रकाश असलेली मोठी भिंत होती आणि मी त्या भिंतीसमोर उभा होतो. मी जिथेही पाहत होतो तिथे फक्त प्रकाशमय भिंत दिसत होती.  माझ्या आजूबाजूला दाट धुकं होतं आणि तिथे मला माझ्या खास मित्र दिसला. धुक्यातून बाहेर येऊन त्याने मला सांगितलं मी अजूनही इथेच आहे मला परत जाता आलं नाही. पण जर तू अंतर्मनाने प्रयत्न केला तर तू परत जाऊ शकतो. हे ऐकल्यावर मी हार मानली नाही, पूर्ण प्रयत्न केला आणि मी परत माझ्या शरीरात परत आलो. त्यानंतर मला शुद्ध आली. त्यावेळी माझ्या शेजारी बसलेल्या माझ्या आईने सांगितलं तुझा मृत्यू झाला होता.


'डोळ्यासमोर अंधार पसरला'



एका व्यक्तीने सांगितलं 'माझी अँजिओग्राफी सुरु होती आणि त्यावेळी मी मशीनच्या स्क्रीनकडे बघत डॉक्टरांसोबत बोलत होतो. हळूहळू मशीनचा आवाज आणि अलार्म बंद झाला. माझ्या आजूबाजूचे लोकं घाबरायला लागली. माझ्या डोळ्यासमोर सगळं मला अंधूक दिसत होतं आणि क्षणार्धात माझ्या डोळ्यासमोर अंधार झाला.


या सर्व व्यक्तींनी सांगितल्या अनुभवात किती तथ्य आहे हे स्पष्ट झालेलं नाही . मात्र Independent.co.uk यांनी केलेल्या संशोधनात हे सर्व अनुभव नमुद करण्यात आले आहेत.


या संशोधनात मृत्यूला चकवा देऊन जे परत आले आहेत अशा लोकांचा अभ्यास करण्यात आला.  म्हणजेच मेडिकल भाषेत मरण्याच्या दारातून परत आलेले लोकं. हे संधोधन तीन विभागात करण्यात आलं.