Israel Hamas War : शक्तिशाली इस्त्रायलसमोर `हमास` का पडतंय भारी?
इजरायल-हमासचं युद्ध आता निर्णायक टप्प्यावर आलंय. सूडानं पेटलेल्या इस्रायलला थांबवणं आता कुणाच्याच हातात नाही.
Israel Hamas Conflict : पॅलेस्टाईनमधून कार्यरत असलेल्या हमास या दहशतवादी संघटनेने 7 ऑक्टोबर रोजी सकाळी अचानक इस्रायलवर रॉकेट हल्ला केला. 20 मिनिटांत 5000 रॉकेट डागून हमासने (Israel Hamas War) संपूर्ण जगाला धक्का दिला. हमासचे दहशतवादी इस्रायलच्या जमिनीवर उतरले अन् त्यांनी इस्रायली लोकांची कत्तल केली. त्यांनी मोठ्या संख्येने लोकांना त्यांच्या घरात आणि रस्त्यावर गोळ्या घातल्या. त्यामुळे इस्त्रायल सैनिकांनी जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. मात्र, हल्ला करून देखील इवलुया हमास इस्त्रायलवर भारी का पडतोय? असा सवाल आता विचारला जात आहे.
हमास का पडतंय भारी?
याशिवाय दहशतवाद्यांनी 100 हून अधिक लोकांचे अपहरण करून त्यांना गाझा येथे नेले. तेव्हापासून हमास आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. वास्तविक, गाझाच्या अरुंद रस्त्यांमुळे या दहशतवाद्यांना लपण्याची जागा निर्माण होते. मात्र इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईमुळे गाझा पट्टीचं चित्र बदलत आहे.
अशा परिस्थितीत जमिनीवर हल्ला करणे कठीण होऊ शकते. जमिनीवर हल्ला केल्याशिवाय हमासचा पूर्णपणे नायनाट करणे इस्रायलसाठी फार कठीण जाईल. इस्रायलचे सुमारे 3 लाख लोक राखीव सैनिक म्हणून युद्धात सामील झाले आहेत. दुसरीकडे हमासही तयारी करून बसला आहे. हमासच्या हल्ल्यात 1300 हून अधिक इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गाझामधील मृतांची संख्या 2200 च्या पुढे गेली आहे.
आणखी वाचा - इस्त्रायल हमास युद्धात elon musk ची उडी;, घेतला 'हा' मोठा निर्णय!
गाझाच्या उत्तर भागातील लोकांना इस्त्रायलने अल्टिमेटम दिला आहे. आयडीएफने उत्तर गाझामधील रहिवाशांना परिसर रिकामा करण्यासाठी 3 तासांचा अवधी दिला. नागरिकांना दक्षिण गाझा येथे जाण्यास सांगण्यात आलंय. उत्तर गाझा येथील जबलिया येथील एका घरावर इस्रायली हवाई हल्ल्यात सहा पॅलेस्टिनी ठार झाल्याची माहिती रॉयटर्सच्या हवाल्याने समोर आली आहे.
इस्रायलची राजधानी तेल अवीव ते गाजा बॉर्डरपर्यंत जाणारे रस्ते आर्मी टँकसनं गजबजून गेलेत. इस्त्रायलचा हा जंगी ताफा हमासचं काम तमाम करण्याच्या इराद्यानं गाजाकडे निघालाय. इस्त्रायल आणि हमासचं युद्ध भडकलेलं असताना इराण त्यामध्ये तेल ओततोय. इस्त्रायलनं गाजामधलं ऑपरेशन थांबवलं नाही तर आम्हाला हस्तक्षेप करावा लागेल, असा इशारा इराणनं दिलाय. इराणची युद्धात एन्ट्री झाली तर हे युद्ध किती काळ चालेल, याचा अंदाजच बांधता येणार नाही.