Kukur Tihar Worship Of Dog In Nepal: प्रत्येक देशात त्या त्या संस्कृतीनुसार सण साजरे केले जातात. त्या सणांचं एक वेगळंच महत्त्व असतं. नेपाळमध्ये 'कुकुर तिहार' सणाला सुरुवात झाली आहे. नेपाळमध्ये 23 ऑक्टोबरपासून पाच दिवस तिहार उत्सव सुरू झाला आहे. म्हणजेच ज्या दिवशी जगभरात दिवाळी साजरी झाली त्याच दिवशी नेपाळमध्ये कुकुर तिहार साजरा करण्यात आला. या दिवशी श्वानांची त्यांच्या निष्ठेसाठी देवदूत म्हणून पूजा केली जाते. नेपाळमधील लोकं श्वानाला यमाचा संदेशवाहक मानतात. यमदेवांना खूश करण्यासाठी श्वानाची मनोभावे पूजा केली जाते. प्रत्येक प्राण्याचा आदर केला पाहिजे, असा संदेशही या सणातून दिला जातो. नेपाळमध्ये दिवाळी सणाच्या निमित्ताने कुत्र्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेपाळमध्ये श्वानांची पूजा केली जाते. कुत्रा प्रामाणिक, इमानी प्राणी म्हणून ओळखला जातो. या सणानिमित्त श्वानांची तिलक माला घालून आरती केली जाते. कुत्र्यांना पक्वान्न खायला दिली जातात. त्याचबरोबर दहीही खायला दिली जाते. 


Eight Wonders: या ठिकाणी तयार होतेय जगातील आठवं आश्चर्य! पाहा Video


कुकुर तिहार हा दिवस पूर्णपणे श्वानांच्या नावावर असतो. या दिवशी लहान मुलांसह सर्व लोक कुत्र्यांचे लाड करतात. त्यांना दूध, अंडी इत्यादी अनेक गोष्टी खाऊ घालतात. या वेळी केवळ स्थानिकच नव्हे तर जगभरातील पर्यटकही या उत्सवात सहभागी होतात.