लंडन : ऋषी सुनक (Rish Sunak) यांच्या रूपाने ब्रिटनला नवा पंतप्रधान मिळाला आहे. कोरोना महामारी आणि त्यानंतर रशिया-युक्रेनमधील युद्धाने ब्रिटनची अर्थव्यवस्था चांगलीच ढासळली आहे. अशा परिस्थितीत ब्रिटनची सत्ता हाती घेणाऱ्या सुनक यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. पण पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या फिटनेसची ही जोरदार चर्चा आहे. (Rishi Sunak Fitness)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपली दिनचर्या सांगितली होती. तुम्ही सकाळी किती वाजता उठता, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, मी सकाळी 6-7 च्या दरम्यान उठतो. सकाळी ते पेलोटन, ट्रेडमिल आणि वर्कआऊट करतात.


न्याहारीबद्दल बोलताना सुनक म्हणाले की, तो आठवड्यातून काही दिवस नाश्ता करत नाही कारण त्यांचा उपवास असतो. आठवड्यातून एकदा ग्रीक दही आणि ब्लूबेरी खाण्याचे कबूल केले. त्याचवेळी, दुपारच्या जेवणाच्या प्रश्नावर सुनक यांनी सांगितले की, ते आपल्या जेवणात गोड पदार्थाचाही समावेश करतात.


सुनक पुढे म्हणाले की, सकाळचा दुसरा नाश्ता म्हणून ते दालचिनी बन्स किंवा पेन ऑ चॉकलेट किंवा चॉकलेट चिप मफिन्स घेतात. कधी कधी ते चॉकलेट्स आणि गोड पेस्ट्रीही खातात. त्यांनी सांगितले की शनिवार व रविवारच्या दिवशी ते आपल्या कुटुंबासोबत घरीच नाश्ता करतात. रविवारी अधूनमधून पॅनकेक्स आणि वॅफल्स खातात.


ब्रिटनचे 57 वे पंतप्रधान


ऋषी सुनक हे ब्रिटनचे 57 वे आणि या वर्षीचे तिसरे पंतप्रधान आहेत. आधी बोरिस जॉन्सन, नंतर लिझ ट्रस आणि आता ऋषी सुनक हे पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसले आहेत. ब्रिटनमधील राजकीय परिस्थिती चांगली नसल्याचं द्योतक आहे आणि आपली खुर्ची तसंच देशातील जनतेला संकटातून वाचवण्यासाठी सुनक यांच्यासमोर मोठी आव्हाने आहेत.