तालिबानचे अफगाणिस्तान : ताबा घेतल्यानंतर काय होईल? दहशतवादी संघटनेचा क्रूर इतिहास जाणून घ्या
Taliban situation in Afghanistan : अफगाणिस्तानच्या (Afghanistan) भागात तालिबानी (Taliban) दहशतवादी वाढत्या प्रमाणात कब्जा करत आहेत.
मुंबई : Taliban situation in Afghanistan : अफगाणिस्तानच्या (Afghanistan) भागात तालिबानी (Taliban) दहशतवादी वाढत्या प्रमाणात कब्जा करत आहेत. अलीकडेच दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानचे दुसरे मोठे शहर कंधारवर कब्जा केला. गेल्या 1 महिन्यात अफगाणिस्तानातील सुमारे 1 हजार नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. अफगाणिस्तानात सत्ता मिळवण्याच्या इच्छेमागे तालिबानचा हेतू काय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. (Afghanistan latest news )
'मिरर'मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, अफगाणिस्तानने अनेक दशकांचे गृहयुद्ध (Civil War) आणि विनाशकारी संघर्षांना तोंड दिले आहे. अफगाणिस्तानमध्ये 1990 च्या दशकात तालिबानचा उदय झाला. ही दहशतवादी संघटना अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या कट्टरपंथी मुस्लिमांची आहे. अफगाणिस्तानात इस्लामिक सरकार काबीज करणे आणि इस्लामिक शरिया कायदा लागू करण्याच्या उद्देशाने तालिबानची स्थापना झाली.
(संग्रहीत फोटो/सौजन्य रॉयटर्स)
तालिबानी अतिरेक्यांनी 1996 मध्ये अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर कब्जा केला आणि नंतर तेथे इस्लामिक शरिया कायदा लागू केला. मग महिलांना शाळेत जाण्यावर आणि कामावर बंदी घालण्यात आली. लोकांना संगीत ऐकण्यास आणि चित्रपट पाहण्यास बंदी होती.
(संग्रहीत फोटो/सौजन्य रॉयटर्स)
त्यानंतर अमेरिकेत 9/11च्या हल्ल्यानंतर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या सरकारने अफगाणिस्तानातील तालिबानला सत्तेतून बेदखल केले. पण यानंतरही युद्ध संपले नाही. यानंतर, शांती चर्चा अनेक दशके चालू राहिली. परंतु अफगाणिस्तानचा प्रश्न कधीच सुटला नाही. आता शेवटी अमेरिका आणि नाटोचे सैनिक अफगाणिस्तान सोडत आहेत आणि तालिबानचा व्याप संपूर्ण अफगाणिस्तानवर झपाट्याने वाढत आहे. (संग्रहीत फोटो/सौजन्य रॉयटर्स)
(संग्रहीत फोटो/सौजन्य रॉयटर्स)
अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा ताबा मिळाल्यानंतर पाकिस्ताननंतर हा देश दहशतवाद्यांसाठी एक मोठे प्रशिक्षण केंद्र बनू शकतो. अफगाणिस्तानात इस्लामिक सरकार स्थापन करणे, हे आपले ध्येय असल्याचे तालिबानने म्हटले आहे. तालिबानी दहशतवादी अफगाणिस्तानच्या संविधानाच्या जागी देशात इस्लामिक शरिया कायदा लागू करू शकतात.