Trending Video : आज एका सेकंदाच प्रेम आणि त्याच एका सेकंदात ब्रेकअप होतं. प्रेम, विश्वास आणि त्यापेक्षा नात्याला जपण्याची इच्छा कमी राहिली आहे. एकापेक्षा अनेकांसाठी संबंध, क्षुल्लक कारणावरुन नातं तोडणं. अगदी लग्नासारखं पवित्र नातंही काही महिने किंवा वर्षांनंतर घटस्फोटाच्या अंधारात हरपून जातात. बॉयफ्रेन्ड गर्लफ्रेन्डमधील नातं जेव्हा तुटतं तेव्हा त्यांच्या मनात एकमेकांविषयी राग असतो. अनेक वेळा जर ते नात घरापर्यंत पोहोचले असेल आणि त्यानंतर ते तुटल्यास घरच्यांच्याही मनात त्याबद्दल नात्याबद्दल किंवा त्या व्यक्तीबद्दल राग असतो. ब्रेकअपनंतर जेव्हा बॉयफ्रेन्ड गर्लफ्रेन्ड आमनेसामने येतात तेव्हा आपण त्यांच्यामध्ये भांडणे अगदी मारहाण होताना पाहतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये मुलाच्या माजी गर्लफ्रेन्डचा सामना त्याच्या आईशी होतो आणि तेही बॉक्सिंग रिंगमध्ये...हो तुम्ही बरोबर ऐकलं. बॉक्सिंग रिंगमधील मुलाची माजी गर्लफ्रेन्ड आणि आईच्या हाणामारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. (When a son s 19 year old ex girlfriend comes in front of a 50 year old mother in a boxing ring viral video Trending now)


काय हे नेमकं हे प्रकरण?


19 वर्षांची तरुणी जी 50 वर्षांच्या आईच्या मुलाची एकेकाळी गर्लफ्रेंड होती. या व्हिडीओमध्ये बॉक्सिंग रिंगमधील आईची कमाल पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. आईने मुलीच्या माजी प्रेयसीचा जो काही ठोसे मारले की पाहणारे थक्कं झाले. आईच्या भयानक प्रहारासमोर तिचा पराभव निश्चित दिसत होता. 


खरं तर जेव्हा या महिलेच्या मुलीचं त्याच्या प्रियकरासोबत खूप वाईट प्रकारे ब्रेकअप झाल्याचं क्लाउट एमएमएला कळलं. क्लाउट एमएमए हे एक पोलीश लढाऊ प्रवर्तक असून ते विचित्र आणि अपमानजनक सामन्यासाठी प्रसिद्ध आहे. ते हॅलोवीन लढा' (Halloween fight) चं आयोजन करतात. क्लाउट एमएमएने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ही महिला आपल्या मुलाच्या माजी प्रेयसीचा खरपूस समाचार घेते आहे. 50 वर्षीय महिलेने बॉक्सिंग रिंगमधील स्टाइल पाहून तिच्या विजयाने नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. 



हा व्हिडीओ पाहून नेटकरी सोशल मीडियावर त्या महिलेचं कौतुक करत आहेत. तर यूजर्सने मजेशीर कमेंट केली आहे तो म्हणाला की, ''मला रागवलेल्या आईचा सामना करायचा नाही''...तर दुसऱ्या यूजर्सने लिहिलं आहे की, ''हे लोगान विरुद्ध डिलन सामन्यापेत्रा अधिक मनोरंजक आहे.'' तर अजून एका कमेंट केली आहे की, ''नात्यातील किंवा लग्नातील सर्व फसवणूक करणाऱ्यांना अशा प्रकारे मारले पाहिजे.''