मंगळ ग्रहावर मनुष्य नेमका कुठे राहणार? NASA च्या संशोधकांनी शेअर केला जागेचा नकाशा
लवकरच मंगळ ग्रहावर मानवी वस्ती विकसीत करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या संदर्भातील मोठी अपडेट समोर आली आहे.
NASA Mars Mission : मंगळ ग्रहावर मानवी वस्ती विकसीत करण्याचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात साकारणार आहे. मंगळ(Mars) ग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी नासा(National Aeronautics and Space Administration) तर्फे संशोधन सुरु आहे. मंगळ ग्रहावर ऑक्सीजन निर्मिती करण्यात नासा यश आले आहे. आता थेट मानवी वस्ती निर्माण करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरु झाले आहेत. मंगळ ग्रहावर मनुष्य नेमका कुठे राहणार याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. NASA च्या संशोधकांनी जागेचा नकाशा शेअर केला आहे.
मार्स आइस-मॅपिंग मिशनच्या मदतीने मंगळ ग्रहावरील संभाव्या लँडिग साईटचे मॅपिंग
NASA तर्फे मंगळ ग्रहावर मानवासाठी सुरक्षित संभाव्या लँडिग साईट शोधल्या जात आहेत. आंतरराष्ट्रीय मार्स आइस-मॅपिंग मिशनच्या मदतीने मंगळ ग्रहावरील संभाव्या लँडिग साईटचे मॅपिंग करण्यात आले आहे. बर्फाळ प्रदेशात आइस कोरिंगच्या मदतीने मंगळ ग्रहावरील पाणी आणि बर्फ मदतीने भविष्यातील मानवी मोहिमांसाठी याची मदत घेतली जाणार आहे. यासह मंगळ ग्रहावरील खडक आणि भूप्रदेश यांचे देखीाल परिक्षण केले जात आहे.
असा तयार केला नकाशा
बर्फाळ प्रदेश तसेच मंगळ ग्रहावरील डोंगराळ प्रदेशात सखोल संशोधन करुन भाव्या लँडिग साईटच्या जागेचा अंदाजित नकाशा तयार करण्यात आला आहे. Context Camera (CTX) आणि High Resolution Imaging Experiment (HIRISE) यांच्या मदतीने मार्स रिकॉनिसन्स ऑर्बिटवर मानवासाठी सुरक्षित लँडिग साईटचा शोध घेण्यात आला आहे.
मंगळ ग्रहावर जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचे अनेक पुरावे
मंगळ ग्रहावर जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचे अनेक पुरावे संशोधनादरम्यान हाती लागले आहेत. मंगळाचे वातावरण पृथ्वीच्या तुलनेत बरेच विरळ आहे. मंगळाचा पृष्ठभाग पृथ्वीवरच्या जमिनीसारखाच आहे, त्यावर दगड, माती, डोंगर, दर्या आहेत आणि ही माती बर्याच प्रमाणात लोहयुक्त आहे. मंगळाचा लालसर रंग हा या लोहाच्या क्षारांमुळेच, गंजामुळेच आलेला आहे. अद्यापही मंगळ ग्रहावर अनेक भूगर्भीय हालचाली घडत आहे. यामुळे मंगळ ग्रहावर मानवी वस्ती निर्माण करणे शक्य आहे का? याबाबत अचूक संशोधन करणे शक्य होणार आहे. मंगळ ग्रहावरील हे भूकंप उल्कापिंडांची टक्कर झाल्याने नाही तर टेक्टोनिक प्लेट यामुळे आले आहेत. मंगळ ग्रहावर टेक्टोनिक प्लेट अजूनही सक्रिय आहेत. 2018 मध्ये अमेरिकन स्पेस एजन्सी ‘नासा’च्या ‘इनसाइट लॅंडर’ने पहिल्यांदाच मंगळावरून येत असलेले आवाज ऐकले आणि रेकॉर्ड केले. ‘इनसाइट लॅंडर’ने मंगळ ग्रहावर 1200 पेक्षा जास्त भूकंपाच्या नोंदी केल्या आहेत.