WHO gave emergency use listing to Sinopharm Covid-19 vaccine: जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन परिस्थितीत सायनोफार्मा कोविड19 लसीला मान्यता दिली आहे. WHO ने मान्यता दिलेली ही पहिलीच चीनी लस  लस आहे. WHO ने या  लसीच्या दोन डोसेवर शिक्कामोर्तब केला आहे. जगातील अनेक देशांमध्ये ही लस वापरली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

WHO ने या आधीच Pfizer-BioNTech, Moderna, Johnson and Johnson, AstraZeneca ला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.


WHO चे प्रमुख टेड्रोस अदनोम गॉम्बेयियस यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायनोफार्मा या बिजिंगच्या लसीला कोविड19 लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे. WHO ची मान्यता मिळवणारी ही सहावी लस आहे.


चीन ऐवजी अल्जीरिया, कॅमरून, इजिप्त, हंगरी, इराक, ईरान, पाकिस्तान, पेरू, युएई, सर्बिया आणि सेशेल्समध्ये या लसीचा वापर केला जात आहे.