Who is Prabal Gurung: सध्या सगळीकडे चर्चा आहे ती म्हणजे मेट गाला 2023 (Met Gala Alia Bhatt Fashion Designer Name) या सोहळ्याची. या सोहळ्याला जगभरातील अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. यावेळी भारतीय सेलिब्रेटींनीही हजेरी लावली होती. आलिया भट्ट आणि ईशा अंबानी यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांच्या आगळ्यावेगळ्या फॅशननं उपस्थितांचं लक्ष वेधलं होतं. परंतु तुम्हाला माहितीये का की ही कलाकारी साकार करणारा ड्रेस डिझायनर नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. या फॅशन (Met Gala 2023) डिझायनरनं सध्या सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. हा फॅशन डिझानयर नक्की कोण आहे तुम्हाला माहितीये का, एकेकाळी हा फॅशन डिझायनर करण जोहरला डेट करण्यावरून चर्चेत आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फॅशन डिझायनरचे नावं आहे प्रबल गुरूंग. हा अमेरिकेतील स्थित फॅशन डिझायनर आहे. फक्त आलिया भट्ट आणि ईशा अंबानीच नाही तर या फॅशन डिझायनरचे कपडे हे अनेक मोठ्या बॉलिवूड सेलिब्रेटींनी परिधान केले आहेत. यात प्रियंका चोप्रा, श्रद्धा कपूर, मिशेल ओबामा, कमला हॅरिस, ओपरा विनफ्रे, लेस्ली ग्रेस यांचा समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, या फॅशन डिझायरची (Prabal Gurung) नेटवर्थ ही 2 मिलियन डॉलर म्हणजेच 16 कोटी इतकी आहे. मध्यंतरी अभिनेता-दिग्दर्शक करण जोहरला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.


कधी केली सुरूवात? 


2009 साली प्रबल गुरूंगनं आपला फॅशन लेबल सुरू केला. त्यानंतर त्याला अनेक चांगले प्रोजेक्ट्समुळे लागले आणि मोठमोठे सेलिब्रेटी त्याचे ड्रेस परिधान करू लागले. प्रबल याचा जन्म हा सिंगापूर येथे झाला. त्यानंतर तो आपल्या आईसह काठमांडू येथे राहायला गेला. तिथून त्यानं आपलं शालेय शिक्षण पुर्ण केलं. त्यानं दिल्लीला तो आपलं फॅशन डिझायनिंगचं स्वप्न पुर्ण करायला आला होता. त्यानंतर या क्षेत्रात उच्चशिक्षण घेण्यासाठी त्यानं न्यूयॉर्क गाठलं आणि त्यानं तिथूनचं आपलं करिअर सुरू केलं. 



कशी मिळाली ओळख?


प्रबलच्या आगळ्यावेगळ्या आणि सुरेख फॅशनची ओळख सेलिब्रेटींच्या मार्फत होऊ लागली आणि त्याचे नावं हे वाढतं गेले. प्रबलनं मध्यंतरी एक पोस्ट व्हायरल केली होती ज्यात त्यानं करण जोहरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या ज्यात त्यानं म्हटलं होतं की, प्यार किया तो डरना क्या, हॅप्पी बर्थडे, KJo. त्यामुळे या पोस्टनंतर चर्चांना (Prabal Gurung and Karan Johar) उधाण आलं होतं. करण जोहर आणि प्रबल गुरूंग एकमेकांना डेट करत आहेत की काय, अशी चर्चा सुरू झाली. परंतु त्यावर खुद्द प्रबलनंच एक लांबलचक पोस्ट लिहून नेटकऱ्यांचा आणि चाहत्यांचा गैरसमज दूर केला होता.