पाकिस्तानात इम्रान खान यांची विकेट, शाहबाज शरीफ नवे पंतप्रधान
कोण आहेत पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ?
कराची : पाकिस्तानच्या राजकारणात सध्या घमासान सुरू आहे. इम्रान खान यांचं सरकार पडण्यात आलं आहे. तर पाकिस्तानचे नवे पंतप्रधान कोण याची घोषणा करण्यात आली आहे. इम्रान खान यांचं सरकार कोसळल्यानंतर इम्रान खान यांना देश सोडून जाण्यावरही बंदी लागण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानात मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेला पाकिस्तानी संसदेतला अविश्वासाचा ड्रामा संपला. त्यानंतर इम्रान खान सरकार कोसळलं. गेल्या 8 दिवसांपासून यावर संसदेत घमासान सुरू होतं. अखेर इम्रान खान सरकार पाडण्यात विरोधक यशस्वी ठरले.
मिळालेल्या माहितीनुसार 342 सदस्यांपैकी 174 मतं अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने पडली आणि इम्रान सरकार कोसळलं. आता पाकिस्तानात पुन्हा एकदा नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तानी मुस्लीम लीगचं सरकार येणार आहे.
कोण होणार नवे पंतप्रधान
पाकिस्तान मुस्लिम लीग गटाचे नवाज हे अध्यक्ष आहेत. पाकिस्तानी संसदेत सध्या विरोधी पक्षनेते नवाझ शरीफ यांचे लहान भाऊ शाहबाज शरीफ आहेत.
तीन वेळा पाकिस्तानातल्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री राहिले आहेत. 1997, 2008, 2013 मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती. 2018 मध्ये सार्वत्रिक निवडणुकात पंतप्रधानपदाचे उमेदवार होते.
शाहबाज शरीफ यांचा परिवार मुळचा अमृतसरचा आहे. 1988 पासून पाकिस्तानी राजकारणात सक्रीय आहेत. 2020 मध्ये मनी लाँडरिंग केसमध्ये त्यांना अटक करण्यात आली. कोट्यवधींच्या अफरातफरीचे शाहबाज यांच्यावर आरोप आहेत. पण त्यांना एप्रिल 2021 मध्ये लाहोर हायकोर्टाकडून जामीन मिळाला होता.
पाकिस्तानात काय घडलं?
8 मार्च- शाहबाज शरीफ यांचा इम्रानविरोधात अविश्वास ठराव
आर्थिक संकट, भ्रष्टाचारावरुन इम्रान सरकारवर अविश्वास ठराव
3 एप्रिल- अविश्वास ठरावावर मतदान ठरलं
संसद उपाध्यक्षांनी ठराव अवैध ठरवत फेटाळला
इम्रान खान यांची पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी
राष्ट्रपती अल्वी यांना 342 सदस्यांची संसद बरखास्त करण्याची तयारी
संसदेनं उपाध्यक्षांचा निर्णय घटनाबाह्य ठरवला
अविश्वास ठरावावर मतदान घेण्याची परवानगी दिली