मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जम्मू-काश्मीर (J&K) आणि लडाखला (Ladakh) भारतापासून वेगळं केलं आहे. कोरोना महामारीचा प्रकोप दर्शवणाऱ्या नकाशात (Map) ही चूक झाली आहे. या प्रकरणात अशी शंका व्यक्त केली जात आहे की, WHOच्या या चुकीमुळे चीनचा हात असू शकतो. कारण चीन आणि WHO यांच नातं कोरोनाच्या काळात समोर आलं आहे. भारताचा नकाशा चुकीचं असल्याचं लंडनमधील एका भारतीय व्यक्तीमुळे नजरेस आले. सोशल मीडियावर WHO चं हे कारस्थान समोर आलं. 


Social Media वर होतेय टीका 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केलेल्या नकाशावरून सोशल मीडियावर टीका केली जात आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर भारतीयांनी यावर करडी नजर ठेवली आहे. असं म्हटलं जातंय की, चीनच्या इशाऱ्यावरून भारताच्या नकाशातून जम्मू-काश्मीर,आणि लडाखला वेगळे करण्यात आलं आहे. लंडनमध्ये राहणाऱ्या आयटी कंसल्टंट पंकज यांच्या नजरेत ही गोष्ट आली. 


वेगळ्या रंगात जम्मू-काश्मीर आणि लडाख 


WHO ने जो नकाशा जाहीर केला आहे यामध्ये जम्मू काश्मीरसोबत लडाख असं भारतापासून वेगळं करण्यात आलं आहे. हा रंग कोडेड मॅप डब्ल्यूएचओच्या अधिकृत वेबसाइटर उपलब्ध आहे. भारताचा भाग यामध्ये निळ्या रंगाने दाखवला आहे. 



इथे उपलब्ध आहे वादग्रस्त MAP 


मॅपमध्ये देशातील दोन नवे केंद्रशासित प्रदेशाला ग्रे रंग दिला आहे. भारताला निळ्या रंग देण्यात आला आहे. अक्साइ हा चिनचा वादग्रस्त भाग आहे याला ग्रे रंग दिला आहे. ज्याला निळ्या रंगाची धार आहे. WHO च्या ‘Covid-19 Scenario Dashboard’मध्ये उपलब्ध आहे.