प्यार भी क्या चीज हैं... `ही` राजकुमारी आहे तरी कोण? जिनं नकार दिल्यावर 13 जणांनी दिला होता जीव
Princess Trending News: असे मानले जाते की सर्व तरुण पुरुष राजकुमारीच्या सौंदर्याने मोहित झाले होते आणि तिच्याशी लग्न करू इच्छित होते. पण राजकन्येने त्यांचे सर्व प्रस्ताव नाकारले.
Princess Trending News: प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं असं म्हणतात परंतु इथे काहीतरी वेगळीच (Love Story of a Princess) गोष्ट होती. एका राजकुमारीच्या मागे तब्बल 13 जणं होती जे तिच्याशी लग्न करू इच्छित होते. परंतु या राजकूमारीनं चक्क सगळ्यांचेच प्रस्ताव धुळीला मिसळले आणि चक्क त्यांना नकार दिला. तुम्हाला वाटेल यात एवढं काय विशेष आहे परंतु तुम्ही पुढे जे वाचाल त्यानं तुम्हालाही धक्का बसेल. त्या 13 तरूणांनी चक्क स्वत:चा जीवच दिला का तर या राजकुमारीनं त्यांच्याशी लग्न करायला नकार दिला म्हणून. तुम्ही म्हणाल ही राजकुमारी नक्की आहे तरी कोण? आम्ही तुम्हाला आज याच राजकुमारीबद्दल सांगणार आहोत. ही कोणतीही रंजक कथा नाही तर ही सत्य कथा आहे. (who was this princess who denied 13 men request to marry her these men who later died)
जे प्रेमात पडतात त्यांच्यासाठी सौंदर्याचे लक्षण केवळ गोरा रंग किंवा शरीराचा आकारच नसतो तर त्यांच्या आत्मा, माणूस आण ती व्यक्तीही महत्त्वाची ठरते. असे लोक आहेत ज्यांच्यासाठी सौंदर्याची व्याख्या वेगळी आहे. आज आम्ही तुम्हाला ज्या राजकन्येबद्दल सांगणार आहोत, जिच्या सौंदर्यावर लोकं अक्षरक्ष: वेडे झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे राजकन्येला मिशा होत्या. पण तरीही लोक त्याच्यावर मरायचे, तिच्यासाठी वाट्टेल ते करायचे, अगदी जीवही ओतायचे. एवढेच नाही तर या राजकुमारीच्या सौंदर्याच्या प्रेमात पडून 13 तरुणांनी आत्महत्याही केली.
असे मानले जाते की सर्व तरुण पुरुष राजकुमारीच्या सौंदर्याने मोहित झाले होते आणि तिच्याशी लग्न करू इच्छित होते. पण राजकन्येने त्यांचे सर्व प्रस्ताव नाकारले. त्यामुळे दुखावलेल्या 13 तरुणांनी आत्महत्या केली. असे म्हटले जाते की राजकन्येचे हे प्रस्ताव नाकारण्याचे कारण म्हणजे तिचे लग्न अमीर हुसैन खान शोजा-ए-सलतानेह (अमीर हुसैन खान-ए-सलतानेह) यांच्याशी झाले होते. ज्यांच्यासोबत त्यांना दोन मुले आणि दोन मुलीही होत्या. पण नंतर त्यांचा घटस्फोट झाला.
ही राजकुमारी कोण होती?
आपण ज्या राजकुमारीबद्दल बोलत आहोत ती ताज अल-काजर सुलताना आहे, जी 19 व्या शतकात इराणची राजकुमारी होती.19व्या शतकात सौंदर्याची वेगळी व्याख्या होती. लठ्ठपणा ही सौंदर्याची पहिली पायरी आहे असे लोक मानत असत. म्हणजेच, ते जितके जाड होते तितकेच ते अधिक सुंदर मानले जात असे. राजकुमारी ताज अल काजर सुलतानाने तेव्हा सौंदर्याच्या सर्व व्याख्या बदलल्या. राजकन्येला जाड मिशा होत्या, तिच्या भुवयाही खूप जाड होत्या. तरीही लोक तिला खूप सुंदर मानत होते.