Weird News : जंगली प्राण्यासोबत सापाची आपल्या सर्वसामान्या लोकांना खूप भीती वाटते. बिबट्या, वाघ, सिंह अगदी चित्ता यांच्या नुसत्या नावानेही आपल्याला थरथराला होतं. सापाने दंश केल्यावर आपल्या वेळेत उपचार मिळाले नाही तर आपल्या मृत्यू अटळ असतो. त्यामुळे सापाचं नाव घेतलं की अंगावर शहारे येतात. चीनमध्ये तर सापाचं सूप प्यायलं जातं. या निसर्गात एक अन्नसाखळी आहे. त्यानुसार जंगलात एक प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करुन जगतो. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो असं विज्ञानात सांगण्यात आलंय. सहसा बलवान प्राणी हा कमकुवत प्राण्याची शिकार करत असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जंगलाचा राजा सिंह आणि बिबट्या या प्राण्यांची धोकादायक शिकारींमध्ये गणना केली जाते. ते त्यांची शिकार अतिशय हुशारी करत असतात. आपला भक्षक निसटू नये अशी शिकार हे करतात. त्यासोबत जास्त मेहनत न करता शिकार करता यावी आणि आपलं पोट भरता येईल असे ते शिकार करतात. 


सिंह हा बहुतेकदा हरण किंवा जंगली म्हशीची शिकार करताना दिसतो. पण तुम्हाला माहिती आहे का की, चित्ताला सापांची शिकार करायला आवडतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, सापासारख्या विषारी प्राण्याला मारुन खाणं हे कसं काय? चित्त्यावर सापाच्या विषाचा परिणाम होत नाही का?  असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर तज्ञ्ज सांगतात की, चित्ता हा हुशार प्राणी आहे तो मूर्ख नाही. तो एका खास कारणासाठी सापांची शिकार करत असतो. चित्ता सापाची शिकार का करतो याचं आज आम्ही तुम्हाला कारण सांगणार आहोत. 


चित्ता सापाची शिकार करतो कारण की...


आपली शिकार होणार आपल्याला धोका आहे हे जेव्हा इतर प्राण्यांना समजतं तेव्हा ते पहिले तर त्या ठिकाणाहून पळ काढतात. पण साप हा अशा प्राण्यांपैकी एक आहे जो धोका वाटल्यावरही पळू शकत नाही. साप जिथे असतो तिथेच थांबतो आणि समोरच्याला घाबरवण्यासाठी तो फणा काढतो. पण चित्तासारखा भक्षकांला भीती दाखवणं सोप नाही. कारण चित्ता हा सहजपणे सापाला मारण्यात यशस्वी होतो.



आता सापाच्या विषाबद्दल बोलायचं झालं तर चित्ता हा बहुतेक वेळा अजगरांसारख्या मोठ्या सापांची शिकार करतो. मोठे साप हे विषारी नसतात. त्यामुळे चित्तावर विषाचा परिणाम होत नाही अन् ते सापाचा शिकार करुन त्यांचा आस्वाद घेतात.