मुंबई : भारतीय नागरिकांप्रमाणे येथील खाद्यसंस्कृतीची देखील एक वेगळीच ओळख आहे. म्हणून भारताची देशभरात एक वेगळीच ओळख आहे. विश्वास बसणार नाही पण ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Scott Morrison) भारतातील समोसाचे प्रेमी आहेत. त्यांनी स्वतः याचा खुलासा केला आहे. एवढ्यारच स्कॉट थांबले नाहीत तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत समोसा खाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी स्कॉट यांनी समोसासंदर्भात एक ट्विट केलं आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ते पंतप्रधान मोदींसोबत समोसा शेअर करू इच्छितात. 



पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील याला उत्तर दिलं आहे.



मोदींनी उत्तर देताना म्हटलं की,'हिंदी महासागरसोबतच भारतीय समोसेसोबतच एकत्र आहे.' Covid-19 विरोधात विजय मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ४ जून रोजी व्हिडिओ कॉलद्वारे आपली भेट होणार आहे. असं मोदींनी उत्तर दिलं. पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलिया पीएम स्कॉट मॉरिसन ४ जून रोजी व्हि़डिओ लिंक द्वारे माहिती देणार आहेत.