Queen Elizabeth: राणी एलिझाबेथ (Queen Elizabeth II) यांच्यानंतर आता शाही परिवाराची गादी प्रिन्स चार्ल्स (King Charles III) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. प्रिन्स चार्ल्स आता पुढचे राज घराण्याचे वारसदार असणार आहेत.  राणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर लगेचच ट्विटरवर कोहिनूर (Kohinoor)  हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. आता चर्चा आहे की, एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुकुटातील अनमोल कोहिनूर हिऱ्याचे काय होणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणाला मिळणार कोहिनूर असलेला ताज ? (Who will get the Kohinoor crown)
रिपोर्टनुसार, कोहिनूर असलेला ताज  ब्रिटनचे नवे राजा चार्ल्स यांची पत्नी आणि प्रिंसेस कन्सोर्ट कॅमिला यांना हा ताज घातला जाणार आहे. त्यांना राणीची अधिकृत पदवी मिळालेली नाही, त्यांना कॉन्सर्ट प्रिन्सेस ही पदवी मिळाली आहे.  कॅमिला यांच्याकडे कोणतेही घटनात्मक अधिकार नसतील.  (Queen Elizabeth death)


गेल्या 100 वर्षांपासून ब्रिटेनमध्ये ही परंपरा पाळली जाते.  महत्त्वाचं म्हणजे 105.6 कॅरेट शुद्धता असलेला कोहिनूर हा जगातील सर्वात मोठा हिरा मानला जातो. हा हिरा 14 व्या शतकात भारतातील आंध्र प्रदेशमधील खाणीतून सापडला होता, असे म्हटलं जातं.


आंध्र प्रदेशमधून कोहिनूर हिरा पंजाब येथे पोहोचला. ब्रिटिशांच्या ताब्यानंतर 1849 मध्ये ब्रिटनच्या तत्कालीन राणी व्हिक्टोरिया यांच्या ताब्यात कोहिनूर हिरा देण्यात आला. काही काळानंतर हा कोहिनूर शाही मुकुटात बसवण्यात आला. भारताशिवाय पाकिस्तान आणि अफगाणिस्तानही कोहिनूरवर आपला हक्क सांगतात. (Kohinoor Shahi crown)