CT Scan Allergy : ब्रिटनच्या नॉर्थम्प्टन जनरल हॉस्पिटलमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेचं सीटी स्कॅन करण्यात आलं त्यानंतर तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर त्या हॉस्पिटलमधील डॉक्टरही आश्चर्यचकित झाले होते. खरं तर या महिलेच्या पोटावर सूज होती. त्याची तपासणी करण्यासाठी ही महिला रुग्णालयात आली होती. डॉक्टरांना जाणून घ्यायचं होतं की, तिच्या पोटावर सूज का आहे ते...


नेमकं काय आहे प्रकरण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिटनमधील नॉर्थम्प्टन जनरल हॉस्पिटलमध्ये सीटी स्कॅन करण्यापूर्वी रुग्णाला एक विशेष रंगाचं औषध असलेलं इजेक्शन देण्यात येतं. ज्यामुळे शरीरातील अवयव स्पष्टपणे दिसण्यात मदत मिळते. पण हाच रंग त्या महिलेच्या शरीरासाठी घातक ठरला. 


डेली स्टारच्या वृत्तानुसार, त्या महिलेच वय हे 66 वर्षीय होतं. या महिलेचं नाव इव्होन ग्रॅहम होते आणि तिची मुलगी योलांडाच्या मते, तिच्या आईला किडनीचा तिसरा स्टेजचा आजार होता. या स्थितीत त्यांना हा रंग द्यायला नको होता, असा आरोप तिने रुग्णालयावर केलाय. डाईचे इंजेक्शन देताच इव्हॉनला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि काही वेळातच तिला हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी तात्काळ तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अपयशी ठरले. 


शवविच्छेदन अहवालातून सत्य आलं समोर 


सुमारे दहा महिन्यांनंतर, कुटुंबाला शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला ज्यामध्ये हे स्पष्ट होते की,  Yvonne चा मृत्यू 'ॲनाफिलेक्टिक रिॲक्शन'मुळे म्हणजेच तीव्र ऍलर्जीमुळे झाला होता. अहवालानुसार, सीटी स्कॅन दरम्यान दिलेल्या रंगावर तिच्या शरीरावर असामान्य आणि घातक प्रतिक्रिया केली. ज्यामुळे त्याची प्रकृती झपाट्याने खालावत गेली. या ॲलर्जीची खात्री करण्यासाठी डॉक्टरांनी काही चाचण्या करण्याचा विचार केला होता, पण या चाचण्या वेळेवर होऊ शकल्या नाहीत.


इव्हॉनची मुलगी योलांडाने रुग्णालयाच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित केलं. त्याचं म्हणणं आहे की जर EpiPen (ॲनाफिलेक्सिसवर उपचार करण्यासाठी वापरले जाणारे इंजेक्शन) स्कॅन रूममध्ये आपत्कालीन परिस्थितीत उपलब्ध असते तर त्याच्या आईचे प्राण वाचू शकले असते. याशिवाय कुटुंबाला या प्रकरणाची संपूर्ण माहिती मिळण्यास दहा महिने लागले, त्यामुळे ते आणखी दुखावले. योलांडा म्हणाली, 'एवढा वेळ का लागला? हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. मला या परिस्थितीचा प्रचंड राग आहे.'


नॉर्थम्प्टनशायर युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्सच्या मुख्य परिचारिका ज्युली हॉग यांनी या प्रकरणी शोक व्यक्त केला. त्यांनी कबूल केले की रुग्णालय वेळेवर कुटुंबाला योग्य माहिती देऊ शकलं नाही, ज्यामुळे त्यांना आणखी त्रास सहन करावा लागला. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. हे दुर्मिळ प्रकरण वैद्यकीय क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा इशारा आहे. साधारणपणे सीटी स्कॅन प्रक्रिया सुरक्षित मानली जाते.