भूक लागली म्हणून महिलेने Online बर्गर मागवला, पण पहिला घास घेताच...
भूक लागली म्हणून तीने बर्गर खायला सुरवात केली, पण बर्गरच्या आत तीने जे पाहिलं त्याने तिला जबर धक्का बसला
Shocking News: मोबाईलमुळे (Mobile) हल्ली अनेक गोष्टी घरबसल्या मिळतायत. शॉपिंग (Shopping) असो की खाद्यपदार्थ हल्ली प्रत्येक गोष्ट ऑनलाईन (Online) ऑर्डर केली जाते. एका क्लिकवर आपल्यासमोर हवा तो खाद्यपदार्थ (Online Food) उपलब्ध होतात. यासाठी ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणारे अनेक अॅप (App) आहेत. पण एका महिलेला ऑनलाईन फूड मागवणं चांगलंच महागात पडलं.
नेमकी घटना काय?
एका महिलेने भूक लागली म्हणून एका फूड अॅपवरुन ऑनलाईन बर्गर मागवला. पण यानंतर या महिलेवर पश्चाताप करण्याची वेळ आली. या महिलेने एग बर्गरची (Egg Bruger) ऑनलाईन ऑर्डर केली. काही वेळाने डिलिव्हरी बॉयने (Delivery Boy) ऑर्डर घरी आणून दिली. मोठ्या चवीने बर्गर खाण्यासाठी त्या महिलेने बर्गरचं पाकिट उघडलं, आणि पहिला घास घेतला. पण घास खाताच बर्गरमध्ये जे दिसलं ते पाहून महिलेला धक्काच बसला. तीने तोंडातला घास तसाच फेकून दिला आणि उलट्या केल्या.
काय होतं त्या बर्गरमध्ये?
या बर्गरचा फोटो महिलेने सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे. बर्गरमधल्या अंड्यातील पिवळं बलक राखाडी झालं होतं आणि त्याला बुरशी लागली होती, असा आरोप या महिलेने केला आहे. ही महिला पेशाने शिक्षिका आहे, या प्रकारामुळे मोठा पश्चाताप झाल्याचा दावा या महिलेने केला आहे.
ऑनलाईन कंपनीचं स्पष्टीकरण
महिलेने आरोप केल्यानंतर ज्या ब्रांडचा हा बर्गर होता त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार केमिकल रिअॅक्शनमध्ये अंड्याचा रंग बदलला असावा. पण या महिलेने हा दावा फेटाळून लावला आहे. बर्गरची चवही विचित्र होती असंही या महिलेने म्हटलं आहे. महिलेने आरोप केल्यानंतर कंपनीने बर्गर बदलून देण्याची ऑफर दिली, पण त्या महिलेने नकार दिला. आता पुन्हा बर्गर खाण्याची कधीच इच्छा होणार नाही असंही या महिलेने म्हटलं आहे.